नेत्यांशी बांधिलकी ठेवण्यापेक्षा, शिवसेनेशी निष्ठावान रहा

  • महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाचे अध्यक्ष उदय दळवी
  • वाडीत महाराष्ट्र वाहतूक सेनेचा मेळावा
  • भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांचा सेनेत पक्ष प्रवेश

वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे
आजच्या घडीला पोलीस,वाहतूक आदी विभागाच्या जाचक व अन्यायकारक गळचेपी धोरणामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक पूर्णपणे डबघाईस आला आहे.वाहनांच्या चाकाच्या गतीनुसार विविध समस्यांचा सामना करीत व्यावसायिकांचा परिवार चालतो.वाहतूक सेनेनी नियमाचे पालन करून आपला व्यवसाय करावा,पक्षाची ताकद सदैव आपल्या पाठीशी आहे.त्यानुसार आपलीही जबाबदारी अत्यंत महत्वाची आहे.पक्षाचे ओळखपत्र ठेऊन शिवसैनिक होता येत नाही त्यासाठी बाळासाहेबांनी सांगितलेले ध्येय,उद्देश व पक्षशिस्त याचा अंगीकार करून त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करावा नेत्यांशी बांधिलकी न ठेवता शिवसेनेशी निष्ठावान रहा असे प्रतिपादन महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाचे अध्यक्ष उदय दळवी यांनी केले.
वाडीतील एमआयडीसी टी पॉईंट जवळील राहुल हॉटेल सभागृहात रविवार २३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाचा मेळावा व पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आला . त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते . यावेळी महाराष्ट्र वाहतुक सेना उपाध्यक्ष विदर्भ संपर्क प्रमुख अशोक बंगला,युवा सेना जिल्हाप्रमुख व बांधकाम सभापती हर्षल काकडे,महाराष्ट्र वाहतुक सेना चिटणीस किताबसिंह चौधरी,शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू तळवेकर, दिवाकर पाटणे,मनोज बरगट,महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गणेश कान्हारकर,जिल्हा उपाध्यक्ष राकेश अग्रवाल,कुमार सव्वाशेरे,रजनीश गिरे,भावराव रेवतकर, स्वप्निल बोराडे,मंगेश कुढे, रामभाऊ सिंह,अखिल पोहनकर,कपिल भलमे,विजय मिश्रा,कमलेश मसराम,क्रांतिसिंग,अजित पाल,सरदार जर्मलसिंग,अजय चौधरी,संदीप उमरेडकर प्रामुख्याने उपस्थित होते .
कार्यक्रमांतर्गत भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडीचे अखीलेश सिंह व काँग्रेसच्या प्रियंका पाचोरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह शिवसेनेत प्रवेश केला. आयोजनासाठी समाधान माने,सचिन बोंबले,प्रमोद शेंदरे,पंकज कडू,अभय वर्मा,नवीन शर्मा,नागेंद्र सिंग,कल्पना लोखंडे,अंबादास शेंडे,अरुणा शेंडे,अर्चना गोमासे आदींनी सहकार्य केले.