नागपूरच्या या भागातील वीज पुरवठा बुधवारी राहणार बंद

नागपूर/प्रतिनिधी:

अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक १६ जानेवारी रोजी प्रताप नगर,गोपाळ नगर सह अन्य भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे. दुपारी १२ ते १ या वेळेत चुनाभट्टी, केंद्रीय कारागृह परिसर, प्रशांत नगर,समर्थ नगर, सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत नवजीवन कॉलनी, प्रगती कॉलनी, अजनी चौक, हिंदुस्थान कॉलनी, राहुल नगर,राजीव नगर,इंद्रप्रस्थ नगर,गजानन धाम , चिंतामणी नगर,तपोवन, भेंडे ले आऊट, पन्नासे ले आऊट, सोनेगाव,सहकार नगर, वसंत नगर,आंबेडकर कॉलेज परिसर,काचीपुरा येथील वीज पुरवठा बंद राहील. 

सकाळी ९ ते १० या वेळेत राहटे कॉलनी, कालीमाता मंदिर परिसर,धंतोली परिसर, सेंट्रल बाजार रोड रामदासपेठ, सकाळी १० ते दुपारी २ या वेळात शंकर नगर, खरे टाउन भगवाघर ले आऊट, मरारटोळी ,तेलंगखेडी, रामनगर परिसर, अमरावती रोड,गोपाळ नगर,दुर्गा मंदिर परिसर,अत्रे ले आऊट, आईटी पार्क परिसर, पडोळे ले आऊट, दीनदयाळ नगरप्रताप नगर, त्रिमूर्ती नगर,सावरकर नगर,व्यंकटेश नगर, चंदनशेष नगर, कृष्णां नगरी,नरसाळा,बेसा येथील वीज पुरवठा बंद राहील. 

सकाळी १० दुपारी १ या वेळेत संघर्ष नगर, शारदा नगर,कबीर नगर,रमाबाई आंबेडकर नगर, भेंडे ले आऊट, राऊत वाडी, मनीष ले आऊट, प्रज्ञा ले आऊट, दुर्गंधामना, सुराबर्डी,वडधामणा परिसरातील वीज पुरवठा बंद राहील