शहराच्या मध्यभागी रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये कामगार सेनेच्या मनसे नेत्यावर गोळीबार





शहराच्या मध्यभागी रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये कामगार सेनेच्या मनसे नेत्यावर गोळीबार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स च्या आत मध्ये दिवसा ढवळ्या गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. शहर पोलीस स्टेशन च्या हद्धीत ही घटना घडली आहे. मनसे कामगार सेना अध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर अज्ञात इसमाने गोळीबार केला. त्यात ते जखमी झाले आहेत. अमन अंदेवार लिफ्ट जवळ थांबले असता मागून येऊन एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर गोळीबार केला.
पोलीस अधीक्षकासह पोलिसांचा ताफा घटना स्थळी पोहचला असून तपास सुरु आहे. मनसे च्या नेत्यावर हा गोळीबार अज्ञात लोकांनी केल्या असल्याचे पोलिसांनी प्राथमिक माहिती सांगितली आहे. पोलीस या गोळीबारा चे नेमके काय कारण आहे याचा शोध घेत तपासचक्रे आरोपीच्या शोधात लागले आहे.
काही वर्ष अगोदर याच रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये अशाच प्रकारचा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. लगातार शहराच्या मध्यभागी असलेल्या या कॉम्प्लेक्स मध्ये आतापर्यंत तीनदा अशा घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अशा घटनांमुळे शहरात सध्या पोलिसाचे वर्चस्व आहे की नाही अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. शहरात सध्या या घटनेने चांगली चर्चा सुरू आहे. पुढील तपास शहर पोलीस स्टेशन सह पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.