भिवकुंड येथे डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह!भिवकुंड येथे डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह!

चंद्रपूर - चिमूर :-
 जिल्ह्यातील   चिमूर तालुक्यातील भिवकुंड येथे डोमन शेष महाराज सिद्धेश्वर मंदिर 14 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे  यावर्षी सुद्धा दिनांक  14 मार्च 2020 ते 21 मार्च 2020 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आले आहे. या सप्ताहात संगीतमय श्रीराम कथा,  हवन व झेंडा पूजन,   घटस्थापना,  दीपोत्सव व दिंडी सोहळा,  हरिपाठ,  संतांचे दर्शन होणार आहेत.  कथाव्यास प. पू.  गुरुवर्य बांगरेजी महाराज यांच्या संगीतमय साथीदारासह  प्रवचन होणार आहेत.  गोपाल काल्याचे किर्तन शनिवार 21 मार्च 2020 ला सकाळी दहा वाजेपासून सुरू होणार आहे. ह. भ. प.  वासुदेव महाराज  यांच्या हस्ते दहीहंडी व गोपाल काला  होणार आहे.  नंतर सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे  आयोजन करण्यात आले आहे.  तरी सर्व भाविक भक्तांनी या होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहचे आपण  सहभाग घ्यावा असे  आव्हान डोमन शेष महाराज सिद्धेश्वर मंदिर  यांच्याकडून करण्यात येत आहे.