दुकानात काम करणारा निघाला चोर, शहर पोलीसांनी केली अटक

नोकरच निघाला टीव्ही चोर, शहर पोलिसांनी आठ तासांच्या ठोकल्या बेड्या

चंद्रपूर : टीव्ही एलईडी च्या दुकानात काम करणारा नोकरच चोर निघाला. या चोरट्याला चोवीस तासांच्या आत शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
शहरातील भिवापूर वार्डातील प्रसिद्ध असलेले प्रिन्स इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या गोदामातून एलजी कंपनीच्या सात टीव्ही चोरी गेल्याचे लक्षात आले ज्याची किंमत दोन लाखांच्या घरात आहे. याची तक्रार मालक राजीव रविशंकर व्यास यांनी काल शहर पोलीस ठाण्यात नोंदविली. यानंतर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचे सूत्रे फिरायला सुरुवात झाली. त्यानुसार त्यांनी टीव्ही विकणारे, फिटिंग करणारे आणि दुरुस्ती करणाऱ्यांची चौकशी सुरू केली. दुकानातील नोकरांची विचारपूस केल्यानंतर रमेश गोवर्धन उईके (वय 39 वर्ष, रा एसपी कॉलेज जवळ गंज वार्ड) हा एक वर्षापूर्वी या दुकानात काम करीत असल्याचे सांगितले. त्या त्यानुसार रमेशला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली शहर पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर ठाणेदार बहादुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी अधिकारी एस आय बाबा महिंद्रा बेसरकर आम्ही दास चलेकार .विलास नीकोडे किशोर तुमराम सिद्धार्थ रंगारी पांडुरग रामकिसन सानप सचिन बुटले प्रमोद डोंगरे मंगेश गायकवाड शाह पोलिस पुढील तपास करीत आहे.