वेकोलिच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत सबसिडीच्या कोळशाची, कोळसा माफियांकडून अफरातफर, *चंद्रपूर जी.एम. कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना “आशिर्वाद ” कुणाचा ?

चिंताजनक :- वेकोलि अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोळसा माफियाद्वारे सबसिडीच्या कोळशाची चोरी ! आशिष, कैलास व इतरांच्या टालवर कोळसा खाली ?


महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन नंतर वेकोलिच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत सबसिडीच्या कोळशाची, कोळसा माफियांकडून अफरातफर, *चंद्रपूर जी.एम. कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना “आशिर्वाद ” कुणाचा ?

कोळसा चोरी प्रकरण!

चंद्रपूर जिल्ह्यात गाजत असलेले कैलास अग्रवाल या कोळसा माफियांकडून कोट्यावधीचे कोळसा चोरी प्रकरण हे थांबता थांबत नसून जिथे महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन कडून वेकोलि प्रशासनाने लघु व मध्यम उद्योगांना सबसिडीचा कोळसा वितरित करण्याचे कंत्राट रद्द केले तिथे आता दस्तुरखुद्द वेकोलि अधिकारीच कोळसा माफियांसोबत हातमिळवणी करून पुन्हा तीच कोळसा चोरीची पुनरावृत्ती करीत असल्याने शेवटी हा सबसिडीचा कोळसा चोरीचा प्रकार चालतोय कुणाच्या आशीर्वादाने ? हा प्रश्न चिंताजनक असून या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू कुकडे यांनी कोळसा मंत्री व सीबीआय यांच्याकडे तक्रार केली त्याचा कोळसा माफियांवर परिणाम  येणाऱ्या काही दिवसात जरी होणार असला तरी सद्यस्थितीत कोळसा माफियांनी आपली कोळसा चोरी वेकोलि अधिकाऱ्यांच्या मार्फत चालवली आहे.

लघु व मध्यम ऊद्दोगाना सबसिडीच्या दरात मिळणारा कोळसा मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जी. एम. कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कोळसा खाणींमधून उचलला जाऊन तो पडोली व नागाडा येथील कोल डेपोवर संग्रहित करण्यात येत आहे. कार्यालयीन कागदपत्रे रंगवून, केंद्र सरकार, वेकोलि व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्थानिक वेकोली प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी कर्मचारी मूर्ख बनवीत आहे. लघु व मध्यम उद्योगांना सबसिडीच्या दरात मिळणारा हा कोळसा चोरट्या मार्गाने कोयला तस्करांपर्यंत पोचविण्यासाठी चंद्रपूर जीएम कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुणाचा “आशिर्वाद प्राप्त झाला आहे?  याच्या तपास करणे आता गरजेचे झाले आहे.

प्राप्त अधिकृत माहितीनुसार गुजरात येथील मेसर्स काठीयावाड कोल अन्ड कोक कंजूमर्स अन्ड ट्रेडर्स असोसिएशन व दि गुजरात कोल, कोक ट्रेडर्स अँड कंझ्युमर असोसिएशन आणि अन्य डीलर्स यांना चंद्रपूर येथील वेकोलि मुख्य कार्यालयातंर्गत येणाऱ्या कोळसा खाणीतून कोळशाची उचल करून वाहतुकीचे अधिकृत कंत्राट देण्यात आले आहे. हा कोळसा मध्यप्रदेशातील विद्युत उद्योगांना पोचता करण्यासाठी सबसिडीच्या दरात दिला जातो. महाराष्ट्र स्टेट मायनिंग कार्पोरेशन च्या माध्यमातून देण्यात आलेले हे कंत्राट अद्यापही सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे उर्वरित कोळसा आता या खदानीमधून काढला जात आहे. खदानीतून निघालेला कोळसा सरळ संबंधित उद्योगापर्यंत पोहोचायला हवा परंतु तसे न होता, हा कोळसा चंद्रपूर जी.एम. कार्यालयातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून मंजुरी पेक्षा जास्त प्रमाणात उचल केल्या जाऊन तो आशिष, कैलास  व इतरांच्या पडोली व नागाडा येथील कोल डेपोवर जमा करण्यात येऊन त्याठिकाणी त्याची छाटणी केल्या जाते व संबंधित उद्योगाला निकृष्ट दर्जाच्या कोळसा पुरवून उच्च दर्जाच्या कोळशाचा काळाबाजार या कोल डेपोवर केल्या जात आहे. संबंधित वेकोलिचे अधिकारी-कर्मचारी यांना यासाठी विशेष “आशिर्वाद ” प्राप्त होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे फेब्रुवारी महिन्यात पडोली व नागाडा येथील कोल डेपोवर चालणारा असाच कोळशाचा  काळाबाजार पत्रकारांच्या चमूने उघडकीस आणला होता. करोडो रुपयांच्या या कोळसा चोरीचे घबाड उघडकीस आल्यानंतर वेकोलि प्रशासनाने महाराष्ट्र मायनिंग कार्पोरेशनचे करार रद्द केला. त्यानंतर वेकोली प्रशासनामध्ये खळबळ माजली होती. मात्र त्याचं महाराष्ट्र स्टेट मायनिंग कार्पोरेशन ने मंजुरी दिलेला उर्वरित कोळश्याची उचल आता करण्यात येत आहे.
देशात कोरोना या या आजाराने थैमान घातल्यानंतर अपराधाची संख्या शून्य झाली आहे. छोट्या-मोठ्या चोऱ्या  करणाऱ्यांनी त्या थांबविल्या आहेत’ परंतु मोठे कोळसा तस्कर मात्र देशावर आलेल्या या संकटातही देशाला देशोधडीस लावण्यात अग्रेसर आहे, हेच यावरून सिद्ध होत आहे. त्यामुळे कोळसा मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआय च्या माध्यमातून करावी व कोळसा तस्करांना कडक शासन करून त्यांची संपती जब्त करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू कुकडे यांनी कोळसा मंत्रालय आणि सीबीआय यांच्याकडे केल्याने आता या प्रकरणी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..