हेड कॉन्स्टेबल बळीराज पवार यांनी स्वतः व पत्नीच्या सहकार्याने तब्बल साडेतीन हजार मॉस्क तयार करून गरजुना वाटले .

पोलिस विभागाला गर्व आहे कॉन्स्टेबल बळीराज पवार यांच्या कार्याचा -ठाणेदार बहादूरे


हेड कॉन्स्टेबल बळीराज पवार यांनी स्वतः व पत्नीच्या सहकार्याने तब्बल साडेतीन हजार मॉस्क तयार करून गरजुना वाटले .

चंद्रपूर प्रतिनिधी :-

जिल्ह्यात कोरोना चा एकही रुग्ण नसला तरी कोरोना व्हायरस पासून आपले सरक्षण व्हावे ya करिता तोंडाला मॉस्क लावणे आवश्यक आहे. पण बाजारात चढ्या दराने मॉस्क विकल्या जात असून सर्वसामान्य गरीब हे मॉस्क विकत घेवू शकत नाही, पर्यायाने पोलिस प्रशासन अशा लोकाना मॉस्क लावण्याची शक्ती करतात त्यामुळे अर्थातच त्या गरीब बिचाऱ्या व्यक्तीकडे मॉस्क खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने तो हतबल होतो. अशा व्यक्तींची दखल शहर पोलिस स्टेशन येथील हेड कॉन्स्टेबल बळीराज पवार यांनी घेतली आणि अशा गरीब गरजू लोकांना आपण टेलरिण्ग चे काम येत असल्यामुळे मॉस्क तयार करून ते दिले तर ? हा प्रश्न त्यांच्या मनात आला आणि अवघ्या काही दिवसातच त्यानी स्वतः कपडा खरेदी करून त्यापासून तब्बल साडेतीन हजार मॉस्क तयार केले व ते अशा गरीब कामगार, मजूर व पोलिस कर्मचाऱ्यांना मोफत वाटप केले, त्यामुळे त्यांच्या या दानी व्रुतीचा परिचय करून सर्व पोलिस कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारची प्रेरणा आहे आणि ही बाब पोलिस विभागासाठी गर्वाची आहे अशी प्रतिक्रिया शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली,