चंद्रपूरचे नायब तहसीलदार अजय भास्करवार यांचे अपघाती निधन दुःखद घटनाचंद्रपूरचे नायब तहसीलदार अजय भास्करवार यांचे अपघाती निधन
दुःखद घटना
चंद्रपूर :दिनचर्या न्युज
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार आज चार वाजताच्या सुमारास तहसीलदार अजय भास्करवार हे मूल मार्गाने चंद्रपूर कडे आपल्या कारने येत होते. मार्गातील चिचपल्ली जवळ असलेल्या एका पेट्रोल पंपासमोर झाङावर कार आदळली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले. चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांनीही दवाखान्यात जाऊन भेट दिली. नेमका अपघात कसा झाला, याची माहिती मिळाली नाही.या दुःखदायक घटनेने त्यांच्या चाहत्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती होताच त्याच्या धर्मपत्नी यांना एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो हीच प्रार्थना.