इतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा!




नाभिक सलून व्यवसायांवर धनधाडंग्यांचे आक्रमण!

इतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा!

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :- तमाम माझ्या नाभिक बांधवानी सावधान होण्याची वेळ आता आली आहे. नाभिक समाजातील समाज बांधवाची परिस्थिती फार गंभीर झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह जिल्ह्यात, शहरांमध्ये नाभिक व्यवसायावर धनधाडंग्यांनी मोठमोठे स्पॉ, यूनी सेक्स पार्लर, ब्युटी पार्लर सलून लावून नाभिक यांच्या पारंपरिक व्यवसायावर आक्रमण केले आहे. असो? असे असले तरी! या पार्लर मध्ये काम करणारी आपलेच नाभिक समाज बांधव आहेत? थोड्या पैशाच्या लालसेने आपल्याला आपल्या स्वतःच्या पारंपारिक व्यवसायापासून हिसकावण्याचा प्रयत्न आहे. इतर समाजातील लोक पैशाच्या माजावर मोठी सलून पार्लर उभी करून आपल्यालाच नोकर म्हणून राबवतात. आपलाच हुन्नर, आपलीच कला, एवढेच नव्हे तर पारंपारिक व विश्वकोषात नाभिकाला आरोग्य वैद्य म्हणून काम करणारा समाज समजल्या जात असत. मात्र कालांतराने बदल झाला असला तरी, समाजातील कला जिवंत ठेवण्याचे काम अजूनही नाभिकांनी ठेवली आहे.
या पारंपरिक व्यवसायाला जिवंत ठेवण्यासाठी आज समाजाला, समाजातील तळागळातील माणसाला सावध होण्याची गरज आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात शहरात ठिकाण ठिकाणी इतर समाजाच्या लोकांनी सलून पार्लर आपल्याच नाभिक बांधवांच्या भरोशावर उघडले आहेत. त्यात काम करणारे पारंपारिक सलून व्यवसाय करणारे कारागीर काम करीत आहेत. आपलेच गोरगरीबांचे पोरं थोड्या लालचे पाई त्यांच्या मोहमायाचा जाळ्यात लटकले जाताहेत. आपल्या संबंधातील, नात्यातील, कुटुंबातील कोणीही नाभिक कारागीर इतर समाजाच्या लावलेल्या दुकानात काम करीत असेल तर! त्यांना समजावून सांगा! ' भविष्यात आपणच आपल्या पायावर धोंडा मारतोय'! म्हणून! नकळत असाच प्रकार चंद्रपुरातील एका पार्लर मध्ये झालेला आहे. त्या पार्लरमध्ये दोन-तीन वर्ष काम केल्यानंतर त्याने स्वतःचे सलून लावण्याचे ठरवल्यानंतर तिथेल इतर समाजातील सलून मालकाने, माझ्याकडे काम सोडले म्हणून तू चंद्रपुरात कोठेही सलून लावणार नाही. अशी धमकीच त्या कारागिराला देऊन टाकली. म्हणजे, आपणच आपल्या व्यवसाय न करण्याची मानसिकता या कारागिरांवर आली. तात्पर्य एवढेच की, हीच पाळी उद्या तुमच्यावर येऊ शकते. म्हणून इतर समाजाच्या सलून दुकानात काम करताना आपण आपल्या समाजातील व्यक्तींनी ईतर ठिकाणी काम न करण्याचा विचार करावा.स्व:त कला अवगत आहे. आपल्याच समाजातील दुकानात काम करावे किंवा स्व:ताचे दुकान टाकावे, एवढा सावधानतेचा इशारा