बेरोजगार अभियंता यांनी अभियंता दिवशीच भज्जी, पकोडे विकुन केली सरकारकडे रोजगाराची मागणी!

बेरोजगार अभियंता यांनी अभियंता दिवशीच भज्जी, पकोडे विकुन केली सरकारकडे रोजगाराची मागणी!

समजसेवक भूषण फुसे यांचे बेरोजगार इंजीनियर यांना घेऊन अनोखे आंदोलन


दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
चंद्रपुर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून नावरूपास आहे. सरकारी उद्योगा सोबतच खाजगी उद्योगही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत.
परंतु जिल्ह्यातील अभियंता बेरोजगारी मोठ्या प्रमाणात निदर्शनास येते. स्थानिक अभियंते बेरोजगार असून खाजगी कंपनीत बाहेरिल अभियंते जास्त प्रमाणात कार्यरत भरणा असून स्थानिक अभियंता मात्र बेकार असून रोडवर पकोडे भज्जी ठेला लावून व्यवसाय करण्याची नामुष्की ओढवली आहे.
स्थानिक अभियंता जिल्ह्यातील पर्यावरण, प्रदूषण, सर्व प्रकारचे कर स्थानिक प्रशासनाला भरतो व सहन करतो परंतू खाजगी उद्योगात यांनाच रोजगाराची संधी उपलब्ध नाही.
जिल्हा प्रशासनाने जर सर्व खाजगी कंपनीत स्थानिक अभियंत्यांना घेणे बंधनकारक केले तर सर्व बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध होतील अशी मागणी घेऊन समजसेवक भूषण फुसे यांच्या नेतृत्वात बेरोजगार अभियंत्यांनी वरोरा नाका चौकात श्रमिक पत्रकार संघा जवळ "बेरोजगारी की मार झेलते रहो, कढाई मे पकोडे तलते रहो" असे नारे देत पकोडे व चाय विकुन बेरोजगार अभियंत्यांनी अनोखे आंदोलन केले.
  सदर मागणी चे निवेदन मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
       यावेळी बेरोजगार अभियंता करिश्मा फोपारे, स्नेहा रत्नपारखी, धम्मदीप भरणे, मोहीत रामटेके, राहूल घडसे, राजकुमार निर्वटला, विमित कोसे आदिंची उपस्थिति होती.