'गर्भसंस्कारा'तून घडवा देशभक्त पिढी : आमदार सुधीर मुनगंटीवार
- चंद्रपूर शहर महापालिकेद्वारे प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व किट वाटप
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, ता. १७ : जगात शक्तिशाली देशांच्या यादीत चीन दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची अनेक कारणे आहेत. परंतु त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे त्यांनी ओळखलेले गर्भसंस्काराचे महत्व आणि त्यांनी सुरु केलेली -९+५ योजना होय. त्यामुळे देशभक्ती कृतीत आणणारी व सुदृढ पिढी घडवण्यासाठी गर्भवती मातांनी गर्भसंस्कारांचे महत्व ओळखणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष व माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतगर्त गरोदर माता लाभार्थ्यांना अनुदान किट वाटप कार्यक्रमाच्या ते बोलत होते. सदर योजनेची माहिती डिजिटल पुस्तिकेमार्फत तसेच इतर माध्यमांद्वारे जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. यावेळी मनपाच्या वतीने महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, सभागृह नेता संदीप आवारी, झोन १ च्या सभापती छबूताई वैरागडे, महिला व बालकल्याण सभापती चंद्रकला सोयाम, महिला व बालकल्याण उपसभापती पुष्पा उराडे, गटनेत्या जयश्री जुमडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, माजी जिल्हा परिषद सभापती ब्रिजभूषण पाझारे यांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शहरातील नोंदणी झालेल्या ७१ गर्भवती मातांना प्रमाणपत्र व किट वितरित करण्यात आले.
यावेळी महापौर राखी कंचर्लावार म्हणाल्या, आई हा एक असा शब्द आहे जो प्रत्येक मूल या जगात आल्यावर सर्वात पहिल्यांदा घेत. या जगामध्ये आई – वडील हि देवाची रूपे आहेत. आईशिवाय कोणताही व्यक्ती आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही. म्हणूनच या आईची काळजी घेतली पाहिजे.
प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले, तर संचालन सुनीता अडबाले यांनी केले. कार्यक्रमाला नगरसेवक संजय कंचर्लावार, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेविका सविता कांबळे, नगरसेविका कल्पना बगुलकर, नगरसेवक सचिन भोयर, अड. राहुल घोटेकर आदीसह मनपाच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
दिनचर्या न्युज