.पुन्हा दुर्गापूर परिसरात बिबट्याने एका मासूम मुलाचा घेतला बळी!
..पुन्हा दुर्गापूर परिसरात बिबट्याने एका मासूम मुलाचा घेतला बळी!

आजोबाच्या अंत्यसंस्कारासाठी आला होता प्रतिक

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :- दुर्गापूर येथील नेरी कोंढी समता नगर परिसरात आज 30 मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान लहान बालक खेळत असताना बिबट्याने बाळाला उचलून घेऊन गेले. बाळाचे नाव प्रतीक शेषराव बावणे वय आठ वर्षे असे नाव आहे.

ते बेलोरा तालुका भद्रावती येथील रहिवासी आहेत. मुलाचे आईचे वडील आज सकाळी मृत्यु पावले. त्यामुळे सर्व कुंटूब तेजराम मेश्राम (महाराज) यांच्या मृत्यू झाल्याने ते सर्व जण दुर्गापूर येथे आले.

मेश्राम यांचे पार्थीव घरीच असल्याने सर्व जण घराच्या समोर बसून होते. तर प्रतीक (नातू) हा घराच्या मागे खेळत होता.तितक्यात बिबट्याने त्या बालकाला फरफटत जंगलात घेऊन गेले. प्रत्यक्षदर्शीनी आरओरडा केल्याने बिबट्याने धुम ठोकली.मात्र त्या

• बिबट्याने लचके तोडले. त्या बालकांचे
वेगवगळ्या ठिकाणी अवयव वनविभागाच्या हाती लागले . या अगोदर या बिबट्याने याच परिसरात तीन लोकांचे जीव घेतले आहेत. वारंवार वनविभागाला या संदर्भाची माहिती देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत आहेत .त्यामुळे या बिबट्याला मारण्याची परवानगी वनविभागनी त्वरित द्यावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. तसेच गावालगत असलेल्या जंगलांना खुले मैदान करण्याची मागणीही ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात येत आहे. वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यास आता यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल. असे दुर्गापूर परिसरातील सर्व जनतेने केले आहे.