कोठरींच्या अखत्यारीतील प्रांगणात रेती कुणाची...?
कोठरींच्या अखत्यारीतील प्रांगणात रेती कुणाची...?

रोज रात्री हायवा ट्रकने येते रेती.

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक रेती घाटांचे लिलाव प्रलंबित आहेत.काही मोजक्याच रेती घाटांचे लिलाव झाले. मात्र रेती तस्करांनी पावसाळ्यात जास्त भाव मिळत या साठी अवैध रेतीची साठवणूक करित असून, मोठ्या प्रमाणात शहरात रेतीची अवैद्य साठवणुक होत आहे.
अश्यातच रेतीचा साठा करून ठेवणे,हा अपराध आहे.परंतु प्रशासनाच्या नाकावर लिंबू पिळून रेतीचा स्टॉक केला जात आहे.असाच एक स्टॉक बागला पोलीस चौकी समोरच काही अंतरावर कोठारी यांच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील पूर्ती बाजारच्या मागील प्रांगणात हा प्रकार आढळून आला असून,"ही रेती कुणाची" असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.विशेष म्हणजे असा रेती साठा करावयाचा असेल तर,महसूल विभागाच्या परवानगीची गरज असते.या नियमांना आता तिलांजली देण्यात येत आहे.

तहसीलदारांना कल्पनाच नाही?

कोठारी यांच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील पूर्ती बाजाराच्या मागील प्रांगणातील रेतीसाठयांबाबत तहसीलदार निलेश गौंड यांच्याशी चर्चा केली असता. ते या बाबत अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले.कर्मचाऱ्यांना पाठवून चौकशी करू अशी ग्वाही त्यांनी दिली.मात्र यांना वारंवार माहिती देवूनही याकडे कोणत्या कारणाने दुर्लक्ष करतात हा मात्र संशोधनाचा विषय आहे.

साठवणुकीची परवानगी दिली कुणी...?

बागला चौकी समोरील जागा ही कधीकाळी उद्योगासाठी लीज वर देण्यात आली होती.ही लीज आता संपुष्टात आली आहे.त्यामुळे या जागेचा सातबारा आहेत की नाही? 
या विपरीत रेतीचा साठा करण्यासाठी सदर जागेचा सातबारा सादर करून रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे.कोठारी यांच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील समाधान पूर्तीच्या मागच्या प्रांगणाचा सातबारा महसूल प्रशासनाला सादर न करता  रेती साठवणुकीची परवानगी दिली कुणी .? कुणाच्या आशीर्वादाने रेती साठवणुक केली जात आहे. असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

कोठारींनी बोलण्याचे टाळले.

समाधान पूर्तीच्या त्या परिसरातील रेतीच्या साठ्याबाबत विचारणा करण्यासाठी मिहीर कोठारी यांच्याशी भ्रमणध्वनिवर चर्चा केली असता त्यांनी थातूर माथूर उत्तर दिले व फोन कापला. माहिती देण्याचे टाळले. नंतर त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही.