अन्: दारुड्याने चक्क पोलिसाची गाडी पळवून नेली!





अन्: दारुड्याने चक्क पोलिसाची गाडी पळवून नेली!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात चक्क पोलिसाची गाडी पळून नेली. अनेक वेळा चोरांनी अनेका च्या गाड्या चोरल्याची बातमी आपण ऐकली असाल परंतु येते, चक्क दारुडानेच पोलिसांची गाडी पळवून नेली. काही वेळासाठी वरोरा पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
दारुडा व्यक्ती दारुच्या नशेत काय करेल, काही सांगता येत
नाही. हा दारुडा आता चर्चेत आला. पोलिसाची गाड़ी पळविणारा हा राकेश नामेवार (25) असं या पोलिसांची गाडी पळवून नेणाऱ्या दारुड्याचे नाव आहे. काल रात्री ड्रंक अँड ड्राईव्ह (drunk and drive) प्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. आरोपीने त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये माझी गाडी परत द्या म्हणून खूप गोंधळ घातला. त्यानंतर नजर चुकवून आरोपीने पोलिसांची 112 ही हेल्पलाईन गाडी सेल्फ मारून पळवून नेली.

बॅरिकेट्सही उडविले

तातडीने पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. आरोपीने गाडी पळवून नेताना आनंदवन चौकातील बॅरिकेट देखील उडविले. त्यानंतर या दारुड्याला मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांनी येनसा या ठिकाणी अडवून ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांची टीम तिथं हजर होती. तरीही या दारुड्यानं पोलिसांच्या डोळ्यात अंजण टाकून गाडी पळवलीच कशी, अशा प्रश्न विचारला जात आहे. पोलीस स्वतःच्यात गाडीचे रक्षण करू शकत नाही. मग, दुसऱ्याच्या गाड्यांना शोधण्याची जबाबदारी किती सक्षमपणे पार पाडत असतील.
टाकून गाडी पळवलीच कशी, अशा प्रश्न विचारला जात आहे. पोलीस स्वतःच्यात गाडीचे रक्षण करू शकत नाही. मग, दुसऱ्याच्या गाड्यांना शोधण्याची जबाबदारी किती सक्षमपणे पार पाडत असतील.

नेमकं काय घडलं?

ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये दारुड्याला अटक करण्यात आली. त्याला वरोरा पोलिसांनी ठाण्यात आणले. तिथं त्यानं माझी गाडी परत करा म्हणून धिंगाणा घातला. पण, पोलिसांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं. हा दारुच्या नशेत काहीतरी बडबड करत असेल, असं पोलिसांना वाटलं. पण, हा दारुडा चालाख निघाला. त्यानं चक्क पोलिसांच्याच ठेवलेल्या गाडीला किक मारून पळाला. विशेष म्हणजे त्यानं एका बॅरिक्टेसला धडकही दिली. त्यानंतर पोलिसांची धावाधाव सुरू झाली. पोलिसांनी या दारुड्याचा पाठलाग केला. त्याला अटक करण्यात आली. या दारुड्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाई पोलिस करीत आहेत.