९३ रक्तदात्यांनी केले रक्तदान, गडचिरोली पंचायत समिती व ग्रामसेवक युनियनचा सामाजिक उपक्रम
९३ रक्तदात्यांनी केले रक्तदान,
गडचिरोली पंचायत समिती व ग्रामसेवक युनियनचा सामाजिक उपक्रम


दिनचर्या न्यूज:-
गडचिरोली प्रतिनिधी:-
गडचिरोली "स्वच्छता ही सेवा' पंधरवडा व सामाजिक दायित्वातून पंचायत समिती व ग्रामसेवक युनियनच्या वतीने पंचायत समितीच्या पटांगणात आयोजित शिबिरात ९३ रक्तदात्यांनी रक्तदान करून जोपासली. सामाजिक बांधिलकी युनियनचे शाखा गडचिरोलीचे अध्यक्ष
बनपुरकर, सचिव रवींद्र शिवणकर उपस्थित होते.
शिबिराचे उद्घाटन जि.प. अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी भुयार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेलार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता तथा प्रकल्प संचालक कुतीरकर, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी अशोक तुमरेटी, कृषी अधिकारी प्रल्हाद पदा, बालविकास प्रकल्प • अधिकारी एन. आर. परांडे, ग्रामसेवक मानले.
कार्यक्रमारंभी जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गिताने रक्तदान शिबिराची सुरुवात केली. यावेळी तालुक्यातील सरपंच, सचिव, आरोग्य कर्मचारी, ग्रामरोजगारसेवक, आपरेटर, पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी, तहसील कार्यालयातील कर्मचारी, शिक्षकवृंद व तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. शिबिरात ९३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

याप्रसंगी गटविकास अधिकारी साळवे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी राऊत, सुधाकर कन्नाके, गुणाकार जुमनाके, नरेशकुमार बोरीकर, सुरज आकनपल्लीवार यांनी सुमधूर संगीतमय गीत सादर केले. शिबिरासाठी जिल्हा रुग्णालयातील रक्त सामान्य संक्रमण अधिकारी व त्यांच्या चमुने सहकार्य केले, रक्तदात्यांना प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. संचालन ग्रामसेविका वासंती देशमुख, बोरीकर तर आभार ग्रामसेवक वायबसे, प्रदीप बारई यांनी केले.