खैरगाव चांदसुरला येथे दोन घरांना आग, आगीत सर्व सामान जळून खाक!
खैरगाव चांदसुरला येथे दोन घरांना आग, आगीत सर्व सामान जळून खाक!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
चंद्रपूर तालुक्यातील खैरगाव चांदसुरला येथे सकाळी दहाच्या सुमारास सकाळी घरी कोणी नसताना अचानक आग लागली. आगीचा भडका इतका होता की, जवळपासचे दोन घरे आगीत सर्व सामान जळून खाक झाले. मालकाचे नाव नामदेव लोणबले, विकास वाडगुरे असून त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. सर्व जीवना आवश्यक वस्तू ह्या आगीत पूर्ण भस्मसात झाल्या.  दोन्ही घरे मातीचे व कौलारू असल्याने आगीचा  भडका झाला.
जवळपास दोघांचे सहा लाखाच्या वर नुकसान झाले असून या आगीत  प्राणहानी झाली नसली तरी, मात्र दोन्ही घरांचे लाखोचे नुकसान  झाले असून शासनाने लवकरात लवकर या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य पंकज ढेंगडे  यांनी केली.
 महसूल विभागाचे अधिकारी, तलाठी कुरेवार यांनी जाऊन पंचनामा केला  असून तात्काळ मदत करण्याचे  आश्वासन दिले.
 सध्या उन्हाळ्याचे दिवस  येत असून, ग्रामीण भागातील अनेक लोक आजही चुल्यावर स्वयंपाक करतात. उन्हाळ्यात अशा आगीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी जास्त काळजी घ्यावी, वेळीच आग (विस्तव) विजला की,  नाही याची  शहानिशा करून घरा बाहेर पडावे.