39 गंभीर अपराध असलेल्या कुख्यात गुंड अमित गुप्ताला हद्दपारचे आदेश !

39 गंभीर अपराध असलेल्या कुख्यात गुंड अमित गुप्ताला हद्दपारचे आदेश !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
कुख्यात गुंडयास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य संबंधीत गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती आणि व्हिडीयो पायरेटस् यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्या संबंधी अधिनियम अंतर्गत स्थानबध्द करण्याचे आदेश
मा. श्री. विनय गौडा जी. सी. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी दिनांक ०८/०३/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे चंद्रपुर शहरचे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे अमित माखन गुप्ता, वय ३० वर्षे, रा- बुधाई वस्ती, महाकाली कॉलरी ०१, चंद्रपुर याचेविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य संबंधीत गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती आणि व्हिडीयो पायरेटस् यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्या संबंधी अधिनियम, १९८१ अंतर्गत स्थानबध्द आदेश पारित करण्यात आला आहे.
स्थानबध्द गुंड अमित माखन गुप्ता याचेविरूध्द प्राणघातक हल्ला करणे, गैर कायद्याची मडंळी जमवुन दंगा करणे, आपखुशीने गंभीर दुखापत करणे, सरकारी नोकरावर जिवघेणा हल्ला करणे, सरकारी नोकराला दुखापत करणे, चोरी, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, अश्लील शिविगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देणे, घरात प्रवेश करून महीलाचा विनयभंग करणे, खंडणी मागणे, राज्य शासणाने काढलेल्या दारूबंदी बाबत आदेशास झुगारून दारू बंदी काळामध्ये स्वतःच्या आर्थीक फायद्यासाठी दारूची अवैधरीत्या वाहतुक व विक्री करणे, वस्तीतील नागरीकांमध्ये भिती व दहशत निर्माण करणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे एकुण ३९ अपराध केलेले आहे. त्याचे विरुध्द कलम ११० सीआरपीसी अंतर्गत प्रतिबधंक कारवाई तसेच त्यास चंद्रपुर मधुन हद्दपार करून सुध्दा त्याचेवर या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही आणि त्याने आपली गुन्हेगारी प्रवृत्ती सुरूच ठेवल्याने त्याचेवर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.

सदरची महत्वपुर्ण कारवाई जिल्हाधीकारी चंद्रपुर, पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर, पोलीस निरीक्षक राजेद्र मुळे रामनगर, पोलीस निरीक्षक महेश कोडावार (स्थागुशा), यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि योगेश खरसान पोस्टे, रामनगर, सपोनि मंगेश भोयर (स्थागुशा), पोउपनि अतुल कावळे (स्थागुशा), पोहवा अरूण खारकर, मनोज रामटेके, नापोका सुधीर मत्ते, पो. अमलंदार अनिल, गणेश भोयर, योगेश सोनवणे, मनोज रामटेके यांनी केलेली आहे.

चंद्रपुर जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता प्रस्थापीत रहाण्याच्या अनुषंगाने अश्या प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगाराविरुध्द आगामी सण उत्सव काळात एम. पी. डी.ए. व ईतर प्रचलीत कायदानुसार कारवाई करण्यात येणार आहे.