जागतिक महिला दिनी ' राखी चव्हाण यांना 'वूमेन जर्नालिस्ट ऑफ द इयर' पुरस्कार

जागतिक महिला दिनी ' राखी चव्हाण यांना 'वूमेन जर्नालिस्ट ऑफ द इयर' पुरस्कार

दिनचर्या न्यूज
नागपुर प्रतिनिधी :-
    ८ मार्च या जागतिक महिलादिनी नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व प्रेस क्लब ऑफ नागपूरच्या संयुक्त विद्यमाने संध्याकाळी ४.३० वाजता प्रेस क्लब ऑफ नागपूर येथे आयोजित एका विशेष समारंभात हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे. या कार्यक्रमात लोकसत्ताच्या प्रतिनिधी राखी चव्हाण यांना 'वूमेन जर्नालिस्ट ऑफ द इयर' पुरस्कार जाहीर झाला आहे.
या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात
भरीव कार्य केलेल्या समाजव्रतीला जीवन गौरव पुरस्काराने गौरवान्वित करण्यात येईल. यासोबतच ज्येष्ठ संपादक एस. एन. विनोद यांच्या दिवंगत पत्नी शोभा विनोद यांच्या स्मरणार्थ वूमेन जर्नालिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान केला जाईल. प्रमुख अतिथी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात राखी चव्हाण यांच्या सोबतच डॉ. ममता खांडेकर, ( सत्ताधीश), मेहा शर्मा (लोकमत टाईम्स), पल्लवी बोरकर (हितवाद), प्रीती अतुलकर (टाईम्स ऑफ इंडिया ) व डॉ. सोनाली पियूष काकडे-पाटील यांना पुरस्कारने गौरविले जाणार आहे. जीवन गौरव पुरस्कार- ज्येष्ठ समाजसेविका डॉ. सीमा साखरे यांना प्रदान करण्यात येईल.