शरद पवारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक करा - चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँगेसचे
पोलिस अधीक्षकांना निवेदन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार आदरणीय. श्री शरदचंद्रजी पवार साहेबांना सोशल मीडियावर " तुमचा लवकरच दाभोलकर होणार,..' अशी जिवे मारण्याची धमकी पोस्टच्या माध्यमातुन देण्यात आली.हे प्रकरण अतिशय गंभीर असुन या धमकीची गांभीर्याने दखल घेवुन सौरभ पिंपळकर यांच्यावर गून्हा दाखल करुन तात्काळ गजाआड करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक मा. परदेशी सर यांच्याकडे देण्यात आले . धमकी मागचा मास्टर माईंड कोण आहे हे शोधावे दाभोळकर हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय झाल्या ही बाब अतिशय चिंता जनक आहे. अशा विचाराच्या समाजविघातक सक्तींना वेळीच रोखणे अत्यंत गरजेचे आहे.
पवार साहेबांना सोशल मीडियारून देण्यात आलेल्या जाहीर धमकीचा निषेध करण्यात आला यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ वैद्य ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे महीला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे बाहादे सर,ज्येष्ट नेते जुनघरी सर जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर काटकर दिपक भुजाडे नगरसेविका मंगला आखरे जिल्हा उपाध्यक्ष वंदना आवडे प्रसिध्दी प्रमुख पूजा सेरकी विधान सभा अध्यक्ष किरण साळवी जिल्हासंघटक सरस्वती गावंडे जिल्हा सचिव नंदा सेरकी तालुका अध्यक्ष वनिता मावलीकर जिल्हा सरचिटणीस शोभा घरडे रेखा जाधव शुभांगी डोंगरवार निर्मला नरवडे महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिनचर्या न्युज