राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव निमित भव्य कृतज्ञता सोहळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा




राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव निमित भव्य कृतज्ञता सोहळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
आरक्षणाचे जनक राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज राजा असूनही लोकशाहीची मूल्य जोपासणारा लोककल्याणकारी राजा, संपूर्ण देश गुलामगिरीत असतानाही समता स्वतंत्रता नाही आणि बंधुताई यांची बीजे आपल्या संस्थानात रोवणारा आणि आधुनिक भारताचे संविधान लागू होण्याच्या 40 वर्षा आधीच आपल्या संस्थानात संविधानाचे तत्वे राबवून आपल्या प्रथेला स्वतंत्र करणारा राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव निमित भव्य कृतज्ञता सोहळा रविवार दिनांक 16 जुलै वेळ सायंकाळी 5 वाजता स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह, चंद्रपूर येथे घेण्यात येत आहे . या कार्यक्रमाचे आयोजन भूमिपुत्र ब्रिगेड आणि इतर परिवर्तनवादी सामाजिक संघटना द्वारे करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. सुरेश एंगडे स्कॉलर, हारवर्ड आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ, कास्ट मॅटर्स या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक, पहिल्या 25 प्रभावशाली भारतीय तरुणा पैकी एक, अनेक पुरस्काराचे विजेते हे असणार आहेत. डॉ. सुरज एंगडे हे मूळचे नांदेड येथील असून त्यांचे उच्च शिक्षण आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि युरोप या चार खंडा मध्ये झाले आहे. या कार्यक्रमाचे दुसरे मार्गदर्शक मा. बाळासाहेब मिसाळ पाटील, अहमदनगर असून ते evm भारतीय लोकशाहीसाठी का? घातक या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. डॉ. विनोद नगराळे, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ चंद्रपूर तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. अभिलाषा ताई गावतुरे, प्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि परिवर्तनवादी कार्यकर्त्या या भूषवणार आहेत , तरी या वैचारिक मेजवानी असलेल्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान पत्रकार परिषदेतून डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. राजू ताटेवार, एड. प्रशांत सोनुले,प्रा. माधव गुरनुले, विजय मुसळे, डॉ. राकेश गावतुरे यांनी केले.
तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा त्यांच्या करिअरच्या दृष्टीने लाभ घ्यावा असे आव्हान भूमिपुत्र ब्रिगेड तसेच सर्व परिवर्तनवादी समाविचारी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.