अँड.वासुदेव महादेव खेळकर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा - ad. Wasudev khelakar
अँड.वासुदेव महादेव खेळकर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध वकील वासुदेव महादेव खेळकर यांचा 75 वा वाढदिवस अमृत महोत्सवी वाढदिवस म्हणून आज आजाद बगीच्या इथे जलतरण तलावाचे मित्र परिवाराकडून साजरा करण्यात आला. त्यांच्या या स्फूर्ती, उत्साह, नियमित व्यायाम, जलतरण करणे, यामुळे आजही खेळकर साहेब तंदुरुस्त असून अशीच शताआयुष्य व्हावी अशी मनोकामना त्यांच्या भावी जीवनासाठी जलतरण मित्र परिवारातर्फे देण्यात आली. 39 वर्षापासून वकिली या क्षेत्रात भरीव योगदान देऊन सर्वसामान्य न्याय मिळवून दिला. मागील पाच वर्षापासून आजाद बगीच्यात असलेल्या जलतरणात नेहमी पोहणे हा त्यांचा नित्यक्रम असून त्यामुळे अनेक इथे येणाऱ्या नवयुकांना प्रेरणा मिळते. अशी भावना मित्र परिवारांनी केली. त्यांच्या भावी आयुष्यासाठी सर्वांना मनोभावी शुभेच्छा दिल्या.