९ सप्तेबरला श्री क्षेत्र पारडी येथे संत नगाजी महाराज गोकुळाष्टमी यात्रा





९ सप्तेबरला श्री क्षेत्र पारडी येथे संत नगाजी महाराज गोकुळाष्टमी यात्रा

विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले वर्धा जिल्ह्यातील पारडी...

दिनचर्या न्युज 
चंद्रपूर :- 
श्रीक्षेत्र पारडी नगाजी येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव यात्रा' दहीहांडी व गोपाळकाला शनिवार दिनांक ९ सप्तेबर 23 ला विविध कार्यक्रमात सम्पन्न होत आहे, दि. ६ सप्तेबर रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव दिनांक (सप्तेबरला श्रींचा पाळणा उत्सव दिनांक ९ सप्टेंबर शनीवारला दुपारी ११ ते २ पर्यंत ह. भ. प. श्री लक्ष्मीकांत दुर्गे महाराज यांचे गोपाळ काल्याचे किर्तन दुपारी ३.०० वाजता दही हांडीचा कार्यक्रम होणार आहे. श्री संत जगाजी महाराजांना दिलेल्या आश्वासनानुसार आजही भगवान गोपाळकृष्ण व माउली ज्ञानेश्वर महाराज चार दिवस मुक्कामी असल्याची भाविक भक्ताची श्रध्दा असून उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना पंढरी व आळंदीची बारी केल्याचे सुख प्राप्त होते. श्री संत नगाजी महाराजांची शास्वत समाधी पारडी येथेच असल्याने महाराष्ट्राच्या काना कोप-यातून हजारों भक्तांची येथे मांदीयाळी असते.

तरी सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात येते की, दि. ९ सप्टेंबर रोज शनिवारला दही हांडी व गोपाळकाल्यास उपस्थित राहून पुण्याचे भागीदार व्हावे असे श्री गोपाळकृष्ण देवस्थान ट्रस्ट पारडीचे वतीने प्रसिद्धी प्रमुख श्री प्रफुल बाडे यांनी कळविले आहे,