दोन वाघाच्या झुंजीत एका नर वाघाचा मृत्यू नुकसान भरपाई द्या, तरच वाघाला न्या गावकऱ्यांचा पवित्रा
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चिमूर तालुक्यातील ताडोबा वन वनपरिक्षेत्रात अंतर्गत येत असलेल्या वहानगाव गावातील सुभाष दोडके यांच्या शेतात आज दुपारी साडेतीन वाजता दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला. ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरतात गावातील नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.
मृत नर वाघाचे वय जवळपास सहा ते सात वर्ष आहे. आहे या दोन वाघाच्या झुंजीत नर वाघाचा मृत्यू झालेले वन विभागात चांगलीच खळबळ उडाली असून सध्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस प्रशासनाने घटनेच्या ठिकाणी तळ ठोकला आहे. संबंधित गावकऱ्यांनी वाघाच्या झुंजीत शेतकऱ्याचे झालेले नुकसान भरपाई दिल्याशिवाय मृत्यू वाघाला येथून नेता येणार नाही असा पवित्रा घेतल्याने गावात चांगलीच खळबळ सुरू आहे. या अगोदर या वाघाने सात जनावरे भस्म केली. त्याची भरपाई अजूनही वन खात्याकडून मिळाली नाही. काही दिवसा अगोदर एका सापाने दोष केल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाला त्याचीही भरपाई दिली नाही. चार गाई तीन बैल वाघाच्या हल्ल्यात मारल्याने शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले असून तीही नुसकान भरपाई वन खात्याकडून अजूनही मिळाली नाही. म्हणून आज संपूर्ण गाववासीयांनी जोपर्यंत शेतकऱ्याची नुसकान भरपाई दिली जात नाही तोपर्यंत वाघ इथून नेवू दिला जाणार नाही. असा पवित्रा वहाणगाववाशी यांनी घेतला आहे. आता संबंधित वनविभाग यावर काय निर्णय देतो याकडे लक्ष लागले आहे.