राज्य उत्पादन शुल्क विभागाची खुलेआम सूट? 'गुड मॉर्निंग'ला प्रिन्स बारला मिळतो 'एकच प्याला' !



राज्य उत्पादन शुल्क विभागाची खुलेआम सूट? 'गुड मॉर्निंग'ला प्रिन्स बारला मिळतो 'एकच प्याला' !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी नंतर तब्बल सहा वर्षानंतर जिल्ह्यात पुन्हा दारू विक्रीला सुरुवात झाली. मद्यपी शौकीनासाठी जणू काही एक पर्वरी घेऊन आली. जिल्ह्यात सगळीकडे परवाधारकांचे परवाने सुरू झाले. परवाधारक शासनाच्या नियमाला ठेंगा दाखवत. नियम धाब्यावर ठेवून राम प्रहरीच ' गुड मॉर्निंग'ला चंद्रपुरातील बार मालकाने दारू विक्रीचा सपाटा सुरू केला आहे. सकाळी पहाटे पाच वाजता पासूनच मद्य पिणाऱ्यांना सकाळीच एकच प्याला प्यायला मिळत असल्याने तळी रामाची तहान भागत आहे. मात्र यामुळे नवयुकावर या मद्यपीचा परिणाम होत असून येणारी पिढी भविष्यात बरबाद होण्याच्या मार्गावर आहे.
चंद्रपूर शहरातील मध्य भागात मुख्य रस्त्यावर असलेल्या प्रिन्स बारच्या मागच्या दरवाजातून खुलेआम मध शौकिनाचा गुड मॉर्निंग प्याला सातला मिळत असल्याने चांगलेच चांगभले होत आहे. जणू काही राज्य उत्पादन शुल्क विभागाने खुलेआम सूट दिली आहे?

सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला ,पुरुषांना दारू विक्रीमुळे मोठा रोष, त्रास सहन करावा लागत आहे.

हा सर्व प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना माहित असताना सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून धूर्त राष्ट्राची भूमिका निभवत आहेत. म्हणून यांच्या कार्य प्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत असून सर्व आर्थिक दिवाळखोरीतून होत असल्याची काही मद्यपी शौकीना कडूनच चर्चा आहे. सूत्राच्या माहितीनुसार यांना एक तारखेच्या अगोदर आर्थिक दिवाळखोरी झाली नाही तर, त्या परमिट रूमला कारवाईची भूमिका घेतात. या सर्व परवाधारकांना शासन नियमाने निर्धारित वेळ दिली असताना सुद्धा त्या वेळेला वाकुल्या दाखवून सर्रास सकाळी तळी रामाची तहान भागवत आहेत. शहरातील

बिअर शॉपी परवाधारकांना बियर विक्री करायची असताना. मात्र अनेक बियर शापीवाल्यांनी आपल्या दुकानाच्या बाजूला तळी रामासाठी पिण्याची व्यवस्था करून सर्रास नियमाचे उल्लंघन करीत आहेत.

 काही परवाधारक सकाळी साफसफाईच्या   बहाण्याने , तर काही मागच्या दाराने सर्रास दारू विक्री करत आहेत. संबंधित विभाग कानाडोळा करीत असल्याने परवानाधारकांचे चांगले  फावत आहे. याकडे मात्र अजूनही राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतलेले दिसून येत नाही. तर सामान्य नागरिकात ही चर्चा आहे की, एक्साईजची परवानाधारकावर कृपादृष्टी तर नाही ना, असा प्रश्न जनसामान्यात होत आहे.