पेट्रोल पंप दोन दिवस बंद असल्याची कुजबुज? पेट्रोल पंप वर वहानधारकाची झुंबड!पेट्रोल पंप दोन दिवस बंद असल्याची कुजबुज? पेट्रोल पंप वर वहानधारकाची झुंबड!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात अचानकच सायंकाळच्या वेळेस पेट्रोल पंप वर पेट्रोल पंप दोन दिवस बंद असल्याची कुजबुज सुरू असल्याने पेट्रोल पंप वर रांगाच रांगा लागल्या!
पेट्रोल दर वाढणार की कमी होणार ?
याची भनक ग्राहकांना लागतात पेट्रोल पंप वाहनधारकांची झुंबड उमली.
नवीन वर्षाचे स्वागत होताच केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात उतार होईल असे संकेत दिले. मात्र याचा फटका पेट्रोल पंप धारकांत होताच . पेट्रोल पंप दोन दिवस बंद आहे असल्याची अफवा वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची झुंबड उमली. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना पेट्रोल पंप का बंद आहे याची काही कल्पना नसताना,
कुठलीही शहानिशा न करता एकमेकाचे पाहून पेट्रोल पंप रांगाच रांगाला दिसून आल्या. संबंधित विभागातील पेट्रोल पुरवठाधारकांना विचारणा केल्या असल्यास असा कुठलाही पेट्रोल पंप बंद राहणार नसल्याचे सांगितले.
मात्र नागरिक एकमेकाचे पाहून पेट्रोल पंप पेट्रोल दोन दिवस पेट्रोल मिळणार की नाही या धास्तीने रांगेत उभे राहून पेट्रोल भरून घेत होते.