भाजपच्या महाराष्ट्र लोकसभेच्या यादीत सुधीर मुनगंटीवारांचे नाव निश्चित!

भाजपच्या महाराष्ट्र लोकसभेच्या यादीत सुधीर मुनगंटीवारांचे नाव निश्चित!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजप आठ उमेदवाराच्या नावाच्या यादीत चंद्रपूर येथील दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांचे नाव यादीत आले आहे. त्यामुळे आता चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या उमेदवारीत सुधीर मुनगंटीवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सूत्राकडून बोलले जात आहे.
यादीत आठ दिग्गज नेत्यांचे नाव जाहीर झाले आहेत .त्यात नागपूर- नितीन गडकरी
जालना- रावसाहेब दानवे,चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
पुणे- मुरलीधर मोहोळ,सांगली- संजय काका पाटील
भिवंडी- कपिल पाटील,दिंडोरी- भारती पवार,बीड- पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे.
महाराष्ट्र भाजपच्या वतीने केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 25 जागांचं सादरीकरण केलं गेलं. मागच्यावेळी 2019 मध्ये विजयी झालेल्या 23 आणि गमावलेल्या दोन जागांचं सादरीकरण या बैठकीत करण्यात आलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे हे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासमोर महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी सादरीकरण केलं.
महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत 25 जागांवर चर्चा झाली. या चर्चेनंतर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी यादी सादर केली. यातल्या काही नावांची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. आजच्या भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.