जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे संकुलनात पाण्याचा हाहाकार ! संकुलनात पिण्याचे पाणी नाही, शौचालयात अतिशय दुर्गंधी!विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका!
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे संकुलनात पाण्याचा हाहाकार !

संकुलनात पिण्याचे पाणी नाही, शौचालयात अतिशय दुर्गंधी!विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यातील नामवंत असे जिल्हा क्रीडां संकुलन व्हावे असे स्वप्न माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आहेत . त्यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
एकीकडे नॅशनल लेवलचे ऑलिम्पिक, जिल्ह्याच्या तालुका क्रीडा संकुलनात मोठ्या उत्सवात,मोठा थाटात घेण्यात आले. जिल्ह्यात एकमेव असलेले जिल्हा क्रीडा संकुलन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे समस्याचे माहेरघर बनले आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे, या संकुलनात मागील एक महिन्यापासून सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्यासाठी दर दर भटकावे लागत आहे. याच संकुलनात स्वच्छतागृहात वॉशरूम साठी पाणी नसल्याने सर्व शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. एकीकडे जिल्हा अधिकारी यांनी जिल्ह्यातील तालुका निहाय संकुलनासाठी करोडो रुपयाचा निधी शासनामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यातर्फे जिल्ह्यातील जलतरण तलाव, जिल्हात तालुक्यातील संकुलन , जलतरण तलाव आणि जिल्ह्यातील बॅडमिंटन कोर्ट साठी करोडो रुपयाचा निधी देण्यात आला .
जिल्हा जलतरण तलावासाठी एक करोड 57 लाख 15 हजार, तर बॅडमिंटन कोर्ट साठी पाच कोटी 39 लाख रुपयांचा निधी शासनाकडून मिळाला गेला आहे. परंतु त्या प्रमाणात या क्रीडा संकुलनात पाहिजे तशी व्यवस्था दिसून येत नाही.
या संकुलनात निष्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले, याची चौकशी झाल्यास या संकुलनात झालेल्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गमन बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. या संबंधित विभागाची जिल्हाधिकारी यांनी, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या जिल्हा क्रीडा संकुलनात होत असलेल्या व्यवस्थेकडे, आणि करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या संकुलनाची जातीने चौकशी केल्यास येथे झालेल्या निष्कृष्ट दर्जाच्या भोंगळ कारभार बाहेर येईल.
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तीव्र उन्हाचे चटके लागत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा क्रीडा संकुलनात मागील एक महिन्यापासून पिण्याचे पाणी नाही. स्वच्छतागृहात वॉशरूम जाण्यासाठी ही पाणी उपलब्ध नाही. सर्वीकडे घाणीचे साम्राज्य आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यात धोका झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील का? असा प्रश्न आता नागरिक करू लागले आहेत.
या संकुलनात रोज हजारो विद्यार्थी सराव करण्यासाठी येतात. त्याचबरोबर या परिसरातील नागरिक याच संकुलनात सकाळी मार्निंग वाक करण्यास येत असतात. त्यामुळे सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॅक वरून चालताना अडथळा निर्माण होत असतो. मैदान खेळून खेळून खड्डेमय झाले आहे. यामुळे मुलांना प्रॅक्टिस करण्यास त्रास होत आहे. असे एका महिला कोचणे माध्यमांना सांगितले.
इथे पोलीस भरतीसाठी सराव करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याकडूनही संकुलनात अनेक प्रकारच्या अजूनही पाहिजे तेवढ्या व्यवस्था झाल्या नसून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सुविधाची पूर्तता करावी अशी मागणी केली आहे.
एकीकडे देशाचे भवितव्य उज्वल असणाऱ्या या विद्यार्थ्याकडून ऑलम्पिक ची तयारी करण्यासाठी नॅशनल लेव्हलचे खेड जिल्ह्यात घेतले जातात. आणि दुसरीकडे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे जिल्हा क्रीडा संकुलन अनेक समस्याचे माहेरघर बनले आहे. या संबंधित समस्या कडे जिल्हा अधिकारी लक्ष देतील का?अशी मागणी आता या मैदानात सरावासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याकडून होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. प्रतिसाद दिला नाही.