निमाओलंपिक २०२४ च्या प्रतीक चिन्हाचे अनावरण



निमाओलंपिक २०२४ च्या प्रतीक चिन्हाचे अनावरण

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या डाॅक्टरांच्या संघटनेच्या चंद्रपूर शाखेद्वारा आयोजित निमाओलंपिक २०२४ या सर्व पॅथीच्या डॉक्टरांच्या विविध क्रीडा प्रतियोगितेच्या प्रतीक चिन्हाचा अनावरण सोहळा स्थानिक यंग रेस्टॉरंट येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
याप्रसंगी सोमय्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हाॅस्पिटल चे संचालक श्री पि.एस.आंबटकर यांची विशेष उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भगवान धन्वंतरीच्या प्रतिमेचे माल्यार्पण व पुजन करण्यात आले. तदनंतर श्री पि.एस. आंबटकर यांच्या हस्ते प्रतिक चिन्हाचे विधिवत अनावरण करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकात निमा चंद्रपूर शाखेचे अध्यक्ष डॉ दिपक भट्टाचार्य यांनी प्रतियोगितेची माहिती दिली. आपल्या मार्गदर्शनात श्री आंबटकर यांनी निमा चंद्रपूर शाखेची मुक्तकंठाने प्रशंसा केली व शुभकामना दिल्या. याप्रसंगी प्रतिक चिन्ह निर्मिती बाबत परिश्रम घेतल्याबद्दल डॉ किशोर भट्टाचार्य यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सचीव डॉ शरद रणदिवे यांनी तर आभारप्रदर्शन आयोजन समितीचे सचिव डॉ अमित डांगेवार यांनी केले. व्यासपीठावर ज्येष्ठ निमा सदस्य डॉ राजु ताटेवार, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ लक्ष्मीनारायण सरबेरे, निमा चंद्रपूर शाखेचे कोषाध्यक्ष डॉ नितीन बिश्वास यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास आयोजन समितीचे कोषाध्यक्ष डॉ. अमित कोसूरकर, डॉ. मनोहर लेणगुरे, डॉ. अनिल कुक्कडपवार, डॉ. प्रदीप मोहुर्ले, डॉ. भूपेंद्र लोढीया, डॉ. जितेंद्र खोब्रागडे, डॉ. मेघराज चांदणांनी, डॉ. विजय भंडारी, डॉ. रविकुमार चिंतावार, डॉ. प्रीती सरबेरे, डॉ. स्नेहल वासाडे, डॉ. प्रांजली आर्या, डॉ. प्रणाली डांगेवार, डॉ. जहाआरा शेख, डॉ. सुष्मा लोधे, डॉ.शील दुधे , डॉ. मनीष मोते, डॉ. मंगेश भरडकर, डॉ. ठाकरे, डॉ. स्वप्नील टेम्भे, डॉ. गोपाल सरबेरे, डॉ. कुणाल पांढरे, डॉ. रुपेश कुमारवार, डॉ. जतीन लेनगुरे, डॉ. सचिन कोल्हे बहुसंख्य निमा आजी माजी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.