शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंत्राटदाराच चांगभलं, जागा भरण्यासाठी होतो रसदची मागणी !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मागील काही वर्षापासून चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कामगार भरण्याचे व व्यवस्थापनासाठी कंत्राट चंद्रपुरातील एका खाजगी कंपनीला होते. परंतु शासनाने नवीन आदेशानुसार महाराष्ट्रातील बारा ते तेरा वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राट पुणे येथील एका स्मार्ट एजन्सी या कंपनीला देण्यात आले आहे. अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कामगारांना काढल्या जात आहे. ज्या कामगारांचे पन्नास वर्ष वय झाले अशांना हळूहळू कामावरून डच्चू दिल्या जात आहे. आणि नवीन भरतीसाठी रसद घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्रास सामान्य जनतेची लूट या माध्यमातून होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात रायपुरे नावाचा सुपरवायझर हा ठाण मानून बसला असून. तिथेच सर्व नवीन भरतीचे व्यवहार होत असून स्मार्ट कंत्राट दाराचे चांगभलं होतं असल्याची सूत्राची माहिती असून
येथे जागा भरण्यासाठी प्रति कामगाराकडून एक ते दीड लाख पर्यंत ही रसद चालत असते अशी चर्चा सध्या चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात सुरू आहे.
स्मार्ट सर्विस एजन्सी पुणे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राट हे पाच वर्षासाठी देण्यात आले असून येथे भरतीच्या नावावर या गोरगरिबांना लुटण्याचा प्रकार होत असल्याची चर्चा आहे.
या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन डॉक्टर कांबळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, पुणे येथील स्मार्ट सर्विस एजन्सीला हे कंत्राट पाच वर्षासाठी देण्यात आले असून. जुन्या कामगारांना कुठल्याही परिस्थितीत काढण्यात येणार नाही. जुन्याच लोकांना ठेवा म्हटलं, नाहीतर मागे ज्याप्रमाणे आंदोलन झाले तसे होता कामा नये, त्याच लोकांना ठेवावे. तसेच जे दहावी पास आहेत अशाच लोकांना घेतल्या जातात. सध्या लोकांच्या कुठल्याही तक्रारी नाहीत. कंत्राटदाराला स्पष्ट सांगितले की, आमचे जुने लोक काढायचे नाहीत.
ज्या कामगाराचे वय 55 वर्षाच्या वर आहे अशांना शासकीय नियमानुसार काढण्यात येईल परंतु इथे जे वर्षानुवर्षापासून जुन्या काम करणाऱ्या कामगारांना कुठल्याही परिस्थितीत काढण्यात येणार नाही. या संदर्भाची आमची कंत्राटदारासोबत चर्चा झाली असून, कुठल्याही प्रकारचा आर्थिक देवाण-घेवानाचा गैर व्यवहार होत नसल्याचे आतापर्यंत आढळून आले नाही तशी तक्रार नाही . असे डिन कांबळे यांनी माध्यमांना सांगितले.