कामगाराच्या नाय हक्कासाठी मल्टी कंपनीच्या विरोधात दहा दिवसाच्या अल्टिमेट नंतर लेबर कोर्टात केस दाखल- म.न.का. सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मनसे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार म्हणाले की, मल्टी कंपनीचे कामगार गेल्या एक महिन्यापासून कामावर जात नाहीत आणि काम थांबवले आहे आणि कामगारांनी जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांना याबाबत माहिती दिली. अमन अंधेवार यांनी कामगारांच्या समस्या ऐकल्यानंतर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या महिन्याच्या ५ तारखेला अमन अंधेवार यांनी कामगार आयुक्तांना निवेदनाद्वारे कळवले होते की, कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या पाहिजेत, अन्यथा आम्ही मनसे स्टाईलने मल्टी कंपनीविरुद्ध आंदोलन करू, परंतु याचाही मल्टी कंपनीवर कोणताही परिणाम झाला नाही.
त्यामुळे आज १९/११/२५ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष पुन्हा एकदा कामगार आयुक्तालयात सर्व कामगार आणि मल्टी कंपनीच्या काही अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, परंतु मल्टी कंपनीचे ते अधिकारी आले नाहीत, त्यामुळे अमन अंधेवार यांनी कामगार आयुक्तांशी चर्चा केली आणि कामगार आयुक्तांनी सांगितले की सर्व कामगारांनी कामावर परत जावे, तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या ८-१० दिवसांत पूर्ण केल्या जातील. अमन अंधेवार यांनी माध्यमांना सांगितले की, कामगारांना कामावर घेतले नाही तर
मल्टी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड विरोधात न्याय मिळवण्यासाठी चंद्रपूर कामगारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना लेबर कोर्टामध्ये सर्व कामगारांना घेऊन आज कोर्टात दाखल झाले. शंभर टक्के कामगारांना न्याय मिळणार म्हणजे मिळणार यासाठी केस दाखल केल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष अमर अंदेवार यांनी दिली.
