Laptop चोरीचा गुन्हा २४ तासात उघड ब्रम्हपुरी पोलिसांची कामगिरी bramhapuri police




Laptop चोरीचा गुन्हा २४ तासात उघड
ब्रम्हपुरी पोलीसांची कामगिरी


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
फिर्यादी कु. स्नेहल राजकुमार एकवणकर वय २९ वर्षे रा. नागभीड हिने पो.स्टे. ब्रम्हपुरी ला येऊन रिपोर्ट दिली की, दिनांक १६/११/६२०२५ रोजी मावस बहिणीचे लग्न असल्याने तीने आपले Acer कंपनीचे लॅपटॉप व इतर सामान हॉल मधील खोली मध्ये ठेवले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले अशा रिपोर्ट वरून पो.स्टे. ब्रम्हपुरी अप क्रमांक ५४२ / २०२५ कलम ३०३ (२) BNS प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की, एक इसम हा लॅपटॉप विक्रीच्या उ‌द्देशाने बाजारात फिरत असल्याचे माहितीवरुन ब्रम्हपुरी पोलीसांनी शोध घेत त्याचे राहते घरी जावुन तो मिळुन आल्याने त्यास विचारपूस केली असता त्याने आपले नाव शेषराव सत्यवान गेडाम वय १९ वर्षे राहणार हत्तीगोटा ता. ब्रह्मपुरी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की, मदनलाल भैयाजी हॉल मधील एका रूम मधून जुना वापरता लॅपटॉप माझ्या मित्रासह चोरून नेल्याचे सांगितले. त्याचे कडून २०,०००/-रुपये किमतीचे लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहे सदर आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा उघड करण्यात आला.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी श्री. राकेश जाधव व पोलीस निरीक्षक श्री प्रमोद बानबले यांचे मार्गदर्शनात सपोनी मनोज खडसे व सोबत पोहवा मुकेश गजबे, पोशी इरशाद खान, निलेश तुमसरे, स्वप्निल पळसपगार, वशिष्ठ रंगारी, चंदू कुलसंगे यांनी केली आहे.