'झाड तिथे सावली, बुवा तिथे बाया': प्रा. श्याम मानव
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर येथे शनिवारी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी सात वाजता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक
प्राध्यापक श्याम मानव यांचे 'बुवा तिथे बाया' या विषयावर जाहीर व्याख्यान झाले. जगात कोणीही चमत्कार करू शकत नाही. मात्र या देशात अनेक बुवा चमत्काराच्या खोटा देखावा करून सामान्याची दिशाभूल करीत आहेत. यात खास करून बुवाबाजीच्या माध्यमातून महिलांचे शोषण हाच बुवाबाजीचा खरा चेहरा असून ते म्हणेल, की "झाड तिथे सावली, बुवा तिथे बाया" यातूनच खऱ्या अर्थाने महिलांचे शोषण करण्याचे साधन बनले आहे. असे प्रतिपादन प्राध्यापक मानव यांनी केले. चंद्रपुरातील अखिल भारतीय अंनिस आणि चंद्रपुरातील विविध सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुधाकर अडबाले होते. मंचावर राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, आणि राज्य संघटक हरिभाऊ पातोडे, चंद्रपुरातील मान्यवरांची उपस्थिती होती.प्रा. श्याम मानव म्हणाले की, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चमत्कार सिद्ध करून दाखवण्यासाठी आपण आतापर्यंत 80 लाख रुपयापर्यंतचे पारितोषिक जाहीर केले, यानंतर सुद्धा आपण एक करोड पर्यंत पारितोषिक जाहीर करू, यासाठी तुमची सर्वांची गरज लागेल. विज्ञानाच्या कसोटीवर उतरून हा चमत्कार सिद्ध करण्याची हिम्मत आजवर एकाही बाबाने दाखविली नाही. नागपुरात भागेश्वर पळून गेल्याचे त्यांनीही यावेळेस म्हटले. यावेळी वरून बुवाबाजीचे ढोंग सर्वीकडे पसरले आहे. राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणी कडे, खास करून राज्यातील फडणवीस सरकारने प्रभावी अंमलबजावणी कडे दुर्लक्ष केल्याचे बोलले. सरकारकडे अजूनही फाईल पडून असले तरी, तिथल्या अधिकाऱ्यांकडून फाईल समोर जात नसल्याचे ते म्हणाले.अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे मोठे राजकारणी, उच्च पदस्थ अधिकारी, या बाबांचे भक्त असल्याचे अशा ढोंगी लोकांना संरक्षण मिळते. दिवंगत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनजागृतीसाठी निधी दिला होता, मात्र तो बुवाबाजी करणाऱ्याच्या संस्थांना वाटण्यात आल्याच्या गंभीर आरोप यावेळीच मानव यांनी केला. ज्याप्रमाणे कुठलाही वृक्ष सावली शिवाय राहू शकत नाही, त्याचप्रमाणे ' बुवा, बाया' शिवाय राहू शकत नाही. पीडित महिलांच्या मनात संकटाची भीती निर्माण केली जाते आणि मग त्या भीतीचा फायदा घेऊन हे बाबा शोषण करतात. राम रहीम, आसाराम बापू, आणि अलीकडेच उद्ययास झालेला' खरात बाबा' भगवान बाबा, यांचे दाखले देत प्राध्यापक मानव यांनी स्पष्ट केले भोंदू बाबा आधी कुटुंबावर संकट येईल अशी भीती घालतात. त्यांच्या परिवाराला त्यांच्या कुटुंबात कुणाचातरी मृत्यू होईल, अशी भीती घालून त्या महिलांचा उपभोग घेतात. आणि मग त्यांच्या संकट दूर करण्याच्या नावाखाली त्यांचे शारीरिक आणि आर्थिक शोषण केले जाते. असे प्रा. शाम मानव यांनी जाहीर व्याख्यानातून सांगितले. या कार्यक्रमाला जिल्हा संघटक अनिल दहागावकर, सचिव धनंजय तावडे, कार्याध्यक्ष प्रदीप अडकिने, रजनी कार्लेकर, अनिल लोणबोले, निखिले चामरे, विजय भोगेकर, यासह चंद्रपुरातील नागरिकांचाा मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला सहभाग दर्शवल्याचे दिसुन आले.

