उद्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चंद्रपूरकर रस्त्यावर !

विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा ...!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
देशातील विद्यार्थ्यांच्या NEET परीक्षेतील गैर व्यवस्थापनाची निपक्ष चौकशी करण्याकरिता अशा विविध मुद्द्यावर वीस- बावीस दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचे उपोषण शांतता मार्गाने सुरू असताना. आरोग्याची समस्या सामोर करून, पोलिसाचा बळगा उघडून, अकृत्य मार्गाने पोलिसांनी त्यांच्या आंदोलन दळपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या निषर्दात विद्यार्थ्यावरील अन्यायकारक शैक्षणिक धोरणाचा निषेध, पारदर्शक न्याय आणि विद्यार्थ्यांना केंद्रीय परीक्षा व शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी हे आंदोलन सुरू असताना. सरकारने दळपशाहीचा उपयोग करून आंदोलन दळपण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा द्यावा या मागणीसाठी देशातील लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
त्या निषेधार्थ आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चंद्रपूर उद्या दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटना यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदया यांना निवेदन सादर करणार आहोत.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन!
येत आहे की, युवक-युवतींनो, शेतकरी बांधवांनो, कामगार बांवांनो, विद्यार्थी मित्रांनो आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जागरूक नागरिकांनो,
देशाच्या हितासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे.
या प्रसंगी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या एकतेची आणि लोकशाहीवरील विश्वासाची ताकद दाखवावी, असे आव्हान करण्यात आले आहे.
दिनांक: उद्या
वेळ: सकाळी १२:०० वाजता
स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर
ही केवळ एका व्यक्तीची लढाई नाही. ही देशाच्या भविष्यासाठी, लोकशाही मूल्यांसाठी आणि जनतेच्या आवाजासाठी उभे राहण्याची वेळ आहे.
म्हणूनच प्रत्येक युवक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला आणि नागरिकांनी या शांततापूर्ण उपक्रमात सहभागी व्हावे. आपली उपस्थिती हा लोकशाहीला दिलेला सन्मान असेल.
चला, एकजुटीने पुढे येऊया. शांततेच्या मार्गाने आपला आवाज बुलंद करूया आणि सोनम वांगचुक यांच्या जनहिताच्या लढ्याला आपले नैतिक समर्थन देऊया.
उद्या सकाळी १२:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे नक्की उपस्थित राहा.
आपली उपस्थिती हीच आपल्या एकतेची सर्वात मोठी ताकद आहे.