वाडीतील अतिक्रमणधारक दुकानावर हातोडा


नगर परिषदेची कार्यवाही 
दुकानदारामध्ये संताप, पोलीस बंदोबस्तात हटविले अतिक्रमण


वाडी / अरूण कराळे नगरपरिषद वाडी प्रशासनामार्फत वाडी ते आठवा मैल पर्यंत महामार्गाच्या किनार्‍यावर शासकीय जागेवर अतिक्रमण करून विविध स्वरूपाचे व्यवसाय करणार्‍यांना अतिक्रमधारकांना दुकाने हटविण्याबाबत नोटीस पाठवून सूचना जारी केल्यानतंरही या व्यावसायिक दुकान मालकांनी अतिक्रमण न काढल्यामुळे अखेर पोलीस बंदोबस्तात कठोर कार्यवाही करीत वाडी नगर परिषद तर्फे राहुल हॉटेल ते पोलीस स्टेशन पर्यंतचे गुरुवार २२ नोव्हेंबर पासून अतिक्रमण काढायला सुरुवात केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 


खबरबातच्या बातमीची दखल- काय होती बातमी वाचा 

 वाडी शहर परिसरातून जाणार्‍या अमरावती-नागपूर महामार्गाच्या दोन्ही बाजुलाअनेक व्यावसायिकांनी शासकीय जागेवरअतिक्रमण करून विविध व्यवसाय थाटला होता.सुरुवातीलाअतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला नव्हता पण दिवसेंदिवस वाढते लोकसंख्या व हळू हळू वाढत गेलेले अतिक्रमण यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमंडली होती .अनेकवेळा अपघाताच्या घटनाही घडल्या होत्या परंतु तत्कालीन ग्राम पंचायत ला मर्यादित अधिकार असल्याने अतिक्रमण काढण्याबाबत अनेक अडचणी निर्माण होत असे.महामार्ग प्राधिकरण अधूनमधून महामार्ग किनार्‍यावरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करते.मात्र काही काळानंतर स्थिती पूर्वरत होते. २०१४ ला ग्राम पंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत झाल्यावर शहर विकासाच्या दृष्टीने नियोजन सुरू झाले.यांत महामार्गावरील अतिक्रमणामुळे विकास कामे,वाहतुकीला अडथळे आदी.बाबी निर्माण होत असल्याचे निदर्शनात आले.अखेर नगर परिषद प्रशासनाने नगरपरीषदेला प्राप्त नगरपालिका अधिकार अधिनियम १९६५ कलम १७९ , १८० ,१८१ चा वापर करीत वाडी ते आठवा मैल भागात महामार्ग किनाऱ्यावरील अतिक्रमणाचे सर्वेक्षण केले.शहरातून गेल्या रस्त्यावरील अतिक्रमण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ अंतर्गत ९ ते २०० नागपूर विभाग व २०० खडगांव रोड पासून आठवा मैल पर्यंत अमरावती विभागात येत असल्याने दोन्ही विभागाचे अधिकारी नगर परीषदेचे मुख्याधिकारी राजेश भगत,वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनात नगरपरिषद चे अधीकारी बांधकाम अभियंता रामकृष्ण कुंभारे, उपमुख्याधिकारी आकाश सहारे, अभीयंता विलास बोरकर,प्रमोद निकाजू,आकांक्षा पाटील,अश्वलेशा भगत,अवि चौधरी,धनंजय गोतमारे, कपील डाफे , मनोहर वानखडे व इतर कर्मचारी व पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढन्यात आले,उद्या पासून रविवार पर्यंत सुट्या येत असल्याने उर्वरित अतिक्रमण सोमवार पासून काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी राजेश भगत यांनी दिली.शहरातील अंतर्गत अतिक्रमण धारकांवरही अशीच कार्यवाही होणार का?ही चर्चा सर्वत्र होती .