संस्काराचा अखंड नंदादीप आर. जी. कुलकर्णी

अमृतमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त लेख


संस्कार हो एक स्फुरण असते त प्रथम मानसिवा पातळीचा प्रगट
होते नंतर तो जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करते आपले जीवन एक परिवर्तनशील प्रवाह आहे. वेलींना फुले यावीत झाडांना फळे लागावीत. त्याप्रमाणे जाणीवेला संस्काराची फळे
फुले येतात ही जाणीव काळाच्या ओघात बाळसे धरते तिला विचाराचे भरते येते हे विचार
आचाराशी एकरूप होतात तेव्हा विचार आणि आचार परस्परांशी संवादी होतात यालाच संस्कार असे म्हणतात. संस्कार हे दीर्घजीवी असतात म्हणून ते नंदादीपसारखे अढळ राहतात. असाच एक संस्काराचा अखंड नंदादीप माजी प्राचार्य आर. जी. कुलकर्णी.
होय त्यांच्या अमतमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त घेतलेला त्यांच्या कार्याचा आढावा
आर. जी. कुलकर्णी यांचा जन्म ३.मार्च . १९४३ रोजी म्हासुर्णे येथे एका ब्राह्माण कुटूंबात झाला प्राथमिक शिक्षण गावीच पूर्ण केल्यानतर पुसमात्रलाच कराड बध माध्यमिक व उच्च शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी पुसेसावळी येथे व नंतर जयराम स्वामी विद्यामंदिर वडगाव येथे शिक्षक. उपप्राचार्य प्राचार्य पदावर सेवा केली.
सरांचा गणित हा आवडता विषय परमेश्वरानंतर त्यांचा गणितावर
विश्चास होता. गणित कधीही चुकत नाही चुकतो तो मनुष्य सराना आपल्या जीवात विद्यार्थ्यांना मानसिक दृष्ट्या सक्षम करून तणाव मुक्त त संकारात्मक विचाराची सवय लावली. वाचले, एकले, अनुभवले. यावून त्यांनी ज्ञानाची शिदोरी
विद्यार्थ्यांना दिली. खाचे फळे म्हणून भूषण आयचित, वसंत अवघडे, डॉ. बबन काटकर, डॉ. रणपिसे, नवनाथ जाधव,प्रभुराज महामुनी विक्रम घार्गे, सोमनाथ घार्गे यांनी शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला सेवानिवृत झाल्यानंतर डॉक्टरांनी . शरीरशास्त्रा विषयी, इंजिनियरनी बांधकामविषयी तर सेवानिवृत न्यायाधिशांनी कायदयविषयी समाजात प्रबोधन करावे व त्याचे नेतृत्व
सेवानिवृत शिक्षकांनी करावे हाच वसा घेऊन त्यांनी समाज सेवेच व्रत या वयात अंगीकारले आहे . आज ह्यांच्या हातात काठी नाही की आवाजात कंप नाही या वयातही त्यांचे तारूण्या ओसांडून वाहत आहे .विचारातून शब्द निर्माण होतात, शब्दातून कृती तयार होते त्यातून उत्तम विचार निर्माण होतात अशी त्यांची धारणा आहे.  जेष्ठ नागरिकांनी आपण आयुष्याच्या मावळतीला
“एकटे” आहोत ही भावना बाळगू नये . यासाठी त्यांनी जोतिबा जेष्ठ नागरिक संघ स्थापन केला : या संघाच्या माध्यामातून जेष्ठांचा सत्कार, जेष्ठांना तज्ञाचे मार्गदर्शन, पर्यटन स्थळांना भेटी, रूग्णसेवा
शिबिरे आयोजित करतात . म्हासुर्णे येथील शिक्षण संल्लागार मंडळ व भैरवनाथ पतपेढीचे ते संचालक आहेत . म्हासुर्णे हे
बहमचैतन्य गोंदावलेकर महाराजांच्या पदस्पशने पुनीत झालेले गांव असून येथे दर गुरूवारी आरती सेवा असते .
सरांना आपल्या “शिक्षक” भूमिकेचा अभिमान वाटतो . तिला अनुरूप त्यांचे वर्तन होते त्यांच्यावर दुर्गुणांची काजळी नव्हती . विद्येवर आणि विद्यार्थ्यावर त्यांचे अलोट प्रेम होते . आपण
शिक्षक होतो याबदल त्यांना आजही धन्यता वाटते आहे .
त्यांच्या या अमृतमहोत्सवी कार्यकमास आमच्या हार्दिक शुभेच्छा

दिलीप पुस्तके
पत्रकार