लावारी- चौरस्ता येथे वाघाने घेतला महिलेचा बळी !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चिमूर वनपरिक्षेत्रात येत असलेल्या भिशी परिसरातील लावारिस चौरस्ता वन क्षेत्रात आज सकाळी सौ विद्या कैलास मसराम वय वर्ष 40 या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना घडली. ही महिला काही कामानिमित्त वन परिसरात लागून असलेल्या शेत शिवारात गेली होती.. तिथे धबबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हमला केला. या घटनेची माहिती परिसरात होतास गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी जमाव झाल्याने पोलीस प्रशासनाला प्राचारण करण्यात आले होते. भिशी ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोंगडे साहेब घटनास्थळी दाखल झाले होते.
कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी जमावाला पोलीस प्रशासनाकडून घटनास्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला.
वन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी पंचनामा करून संबंधित बॉडीला पी एम साठी चिमूर येथे पाठवण्यात आले. मयत महिलेच्या कुटुंबाला तातपूर्ती वनविभागाकडून आर्थिक मदत करण्यात आली.
या परिसरात आता वाघांची संख्या फार मोठी झाली असून या परिसरातील अनेक गावे दहशतीत आहेत. शेतीचा हंगाम असल्याने प्रत्येकाला आपल्या शेतीत जावं लागतं. परंतु वन क्षेत्राशी लागून असलेल्या शेतकऱ्यांना मात्र जीव मुठीत घेऊन शेतीवर जावं लागत आहे.या पूर्वी वाघाने अनेक पाळीव प्राण्यांना आपले भक्ष बनवले होते. परंतु आता पहिल्यांदाच वाघाने एका महिलेला भक्ष बनवल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत व कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याची मागणी ग्रामस्थानाकडून करण्यात येत आहे. गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.
