वायगाव येथे वाघाने अभय कुळमेथेला केले गंभीर जखमी



वायगाव येथे वाघाने अभय कुळमेथेला केले गंभीर जखमी

दिनचर्या न्यूज:-

चंद्रपूर:-

चंद्रपूर तालुक्यातील मामला वनपरिक्षेत्र येत असलेल्या वायगाव येथील जंगलाला लागून असलेल्या तलावाजवळ अभय केशवराव कुळमेथे वय 55 वर्ष याला सकाळी साडेनऊ वाजता वाघाने गंभीर जखमी केले आहेत.

वनपरिक्षेत्रात मामला येथील अधिकारी यांना गावकऱ्यांनी माहिती दिली असता घटनास्थळी वन अधिकाऱ्यांनी दाखल झाले नव्हते. जखमी व्यक्तीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात एक तासानंतर वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी नेले नसल्याची माहिती आहे.

घटनास्थळी वनरक्षक मोहरले, व वाघ मॅडम उपस्थित असल्याची माहिती आहे. संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी उशिरापर्यंत दाखल झाले नव्हते. तोपर्यंत जखमी हा घटनास्थळी असल्याचे गावकऱ्याकडून बोलले जात आहे. जखमी व्यक्तीचा पंचनामाही न झाला असल्याची खबर येत आहे. गंभीर जखमी असलेला अभय हा कामानिमित्त तलावा जवळील जंगल परिसरात गेला असल्याची माहिती आहे. वाघ तलावाजवळ स्थान म्हणून बसला होता. त्याने अभय कुळमेथे वर हल्ला करून त्याच्या चेहराच विद्रूप केल्याचे सामोरे येत आहे. गावकऱ्यांनी घटनास्थळी एकत्र येऊन संबंधित व्यक्तीला उपचार उपचारासाठी तात्काळ नेण्याची मी केली असून त्याला आर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे.