व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समितीची सभा


वाडी / अरूण कराळे:
रुग्णा विषयी चर्चा करतांना मान्यवर

व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्याच्या अडचणी संदर्भात प्रत्येक नागरीकांना रुग्णसेवा मिळावी तसेच रुग्णाच्या हिताचे प्रश्न सोडविण्याकरीता रुग्ण कल्याण समितीची सभा पार पडली . यावेळी पंचायत समीतीचे उपसभापती सुजित नितनवरे , रुग्ण कल्याण समीतीचे अध्यक्ष जि. प. सदस्या प्राणिता कडू , सहअध्यक्ष संध्या गावंडे, वंदना पाल, पंचायत समीती सदस्य भारती पाटील, सुजीत अतिकारी, सरपंच विठोबा काळे , सुरेश थुटूरकर, आर. पी. सुखदेवे प्रामुख्याने उपस्थित होते .प.स. नागपूर पंचायत समीती अतंर्गत असलेल्या ग्रामपंचायत मध्ये लोक कल्याणार्थ आरोग्य सेवा राबविण्याचे आवाहन पं .स. उपसभापती सुजित नितनवरे यांनी केले .ग्रामिण भागात स्वच्छता अनियमीत केल्यास आजाराला आमंत्रण देणे होय करिता प्रत्येक ग्राम पंचायत तर्फे धूळ फवारणी करणे गरजेचे आहे . तसेच पाणी उकळून पिणे , सभोवतालाचा परिसर स्वच्छ ठेवणे, गाव हगणदारी मुक्त करणे , शुध्द पाणी पुरवठा करणे आदि विषयावर अध्यक्ष प्रणिता पाटील यांनी मार्गदर्शन केले .आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्ण कल्याण समीतीच्या सचिव डॉ. सोनाली बंन्सोड यांनी सांगीतले की सर्वात जास्त रुग्ण हत्ती पायाचे विदर्भात आहे . हत्तीपाय ज्या डासापासुन होतो त्याचा नायनाट करण्यासाठी वेंट पाईपला जाळी लावणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन डासाची उत्पत्ती थांबविण्याची गरज असल्याचे सांगीतले .