झेडपीतील बारा बोगस दिव्यांगावर निलंबनाची कारवाई, बाकी दिव्यांग्याचे काय ? दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडेंच्या आदेशाने जि. प. सीईओ यांची कारवाई




झेडपीतील बारा बोगस दिव्यांगावर निलंबनाची कारवाई, बाकी दिव्यांग्याचे काय ?

दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडेंच्या आदेशाने जि. प. सीईओ यांची कारवाई

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर (प्रतिनिधी):- chandrapur
महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे यांनीशासनामध्ये सेवेत असलेल्या राज्यातील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश जारी केलेले आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागामध्ये कारवाई सुरु झालेली आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कार्यरत असलेल्या 95 दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तपासणीनंतर दिलेल्या मुदतीत यूआयडी( वैश्विक) व प्रमाणपत्र सादर केले नाहीत अशा कर्मचाऱ्यांवर टप्प्याटप्याने कारवाई सुरु झालेली आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी बारा बोगस कर्मचारी,अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे, त्यांना तसे आदेशही पारित झाले आहेत,अशी सूत्राकडून माहिती मिळाली आहे.
जि.प.च्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात आलेली आहे. यात जवळपास जास्त शिक्षक, कर्मचारी हे बोगस पद्धतीने दिव्यांग असल्याचा फायदा घेत भरती झालेले असल्याचे कळते. झाडाझडतीनंतर यांच्यावरही घरी जाण्याची वेळ येणार आहे. सदर धडक कारवाईने बोगस प्रमाणपत्र घेऊन भरती झालेल्या दिव्यांगांना घाम फुटला आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर टप्प्याटप्प्याने कारवाई सुरु झाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे.
अनेक कर्मचाऱ्यांनी तपासणी करून प्रमाणपत्र ऑनलाईन सादर केले आहेत. जिल्हा परिषद कडून नियुक्त करण्यात आलेल्या पथकाकडून तपासणी करण्यात आली.
यामधील 12 दिव्यांगांचे प्रमाण कमी आल्याने त्यांच्यावर विलंबनाची कारवाई आली. या अशी नोटीस बजावण्यात आली.जिल्हा परिषदेच्या कन्नमवार सभागृहामध्ये उपस्थित राहुन तपासणी करण्या करीता निर्देशीत करण्यात आले होते. परंतु या दिव्यांगाना ऑनलाइन प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र सादर करता आले नाही. म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद ,पंचायत समिती मध्ये कार्यरत 12 कर्मचारी अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे समोर येत आहे. ही निलंबनाची कारवाई केली असली तरी नियमबाह्य कारवाई असल्याचे, काही अधिकारी, कर्मचाऱ्यात बोलले जात आहे.
परंतु ही कारवाई झाली असली तरी अनेक विभागात अजूनही बोगस कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत त्यांचे काय? असा प्रश्न आता सर्व सामान्य नागरिकात विचारला जात आहे.