उपभोक्ता शुल्क त्वरीत रद्द करा:राजु झोडे

बल्लारपूर/प्रतिनिधी:
बल्लारपूर नगरपालीका अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियोजना करिता व्यापारी व जनतेकडुन अव्वाच्या सव्वा रक्कम वसुल करण्याची जाहीरात नगरपालीकेनी जाहीरातीद्वारा प्रसिद्ध केली.मात्र बल्लारपूरातील सर्वसामान्य जनता आपले सर्व नगरपालीकेचे कर मालमत्ता करातच भरत असल्याने घनकचरा व्यवस्थापन नियोजनाकरिता पुन्हा अतीरीक्त कर व्यापारी व जनतेकडुन वसुल करणे म्हणज व्यापारी वे जनतेची शुद्ध फसवणुक करणे होय असे स्पष्ट मत बिआरएसपीचे नेते राजुभाऊ झो़डे यांनी केले.
बल्लारपूर नगरपालीकेद्वार जाहीर केलेला आदेश त्वरीत रद्द करुन व्यापारी व जनतेकडुन होणारी आर्थीक लुट लवकरात लवकर थांबवावी अन्यथा बल्लारपूर येथील संपुर्ण व्यापारी व जनता बिआरएसपीचे राजु झोडे यांच्या नेत्रुत्वात तिव्र निदर्शने व आंदोलन करणार याची संपुर्ण जबाबदारी नगरपालीकेची राहील असा ईशारा राजु झोडे संपत कोरडे,सचिन पावडे,मनोज बेले,सतिश करमनकर,झॉकिर खान,जयवंत जिवने आदी यांनी दिला.