रागाच्या भरात पतीने केला पत्नीचा खून

उमेश तिवारी/कारंजा(घा):

  कौटुंबिक भांडणात पतीचा राग अनावर होऊन त्याने कुर्हाडीने पत्नीचा खून केल्याची घटना  गुरुवारी  सकाळी ११ च्या दरम्यान कारंजा (घाडगे) तालुक्यातील जुनापनी (टॉवर) या गावी घडली. मृतक पत्नीचे नाव सौ.संध्या केशव भस्मे वय ३२ वर्ष असे आहे. घटने नंतर पती केशव भस्मे हा स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाला. मृतक महिला माहेर वर्धा जिल्ह्यातील खरागना येथील असून ती श्री.दिवाकर लाडे यांची कन्या आहे. तिचे लग्न ११ वर्षा पूर्वी झाले असून तीला २ लहान मुली आहेत. पती केशव भस्मे हा कारंजा येथील किराणा दुकानात नौकरी करीत होता. आज तो घर कामासाठी घरीच होता. मृतक सांध्यांचे वडील काही दिवसांपूर्वी जुनापाण्यात आले होते. ते शेतात होत. पती केशव भस्मे हा घरी कुराडीने काम करीत असतांना पत्नीसी वाद झाला त्याने तिच्या डोक्यावर कुराडीने एवढा जबर वार केला की तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने  जमिनीवर पडली. यात मुलीने आरडाओरडा केला.आजूबाजूच्या नागरिकांनी तिला कारंजा ग्रामीण रुग्णालयात आणले आणि वाटेतच तिचा मृत्यू झाला. पोलिसानी ताबडतोब कार्यवाही व पंचनामा केला व प्रेताची उत्तरीय तपासणी केली तिचा अंत विधी तिच्या माहेरी खरागना येथे होणार असल्याचे समजते. उपविभागीय पोलिस अधिकर्यांनी घटने स्थळी भेट दिली असता त्यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास करीत आहे. पोलिसांनी ३०२ चा गुन्हा नोंदविला आहे.