निवडणुकांमध्ये बुथ व शक्तीकेंद्र प्रमुखांची भुमिका महत्वाची:अहीर

जिवती व कोरपना येथे बुथ व शक्तीकेंद्र प्रमुखांचा अभ्यास वर्ग संपन्न
चंद्रपूर/प्रतिनिधी:-
राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असुन कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच निवडणुकांना समोर जाणे शक्य आहे. तसेच बुथ व शक्तीकेंद्र प्रमुख हे निवडणुकीत अत्यंत महत्वाची भुमिका बजावत असुन त्यांच्या बळावर निवणुकामध्ये यष संपादन अवलंबुन असते. आगामी निवडणुकींना सामोरे जात असतांना सरकार कडुन अनेक लोकाभिमुख योजना राबविण्यात येत आहे. त्या समाजातील वटच्या घटकापर्यंत पोहविण्याची जबाबदारी आपल्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांची असल्याचे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी कोरपना व जिवती येथे आयोजित भाजपा बुथ प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख अभ्यास वर्गादरम्याण व्यक्त केले.
कोरपना येथील ओम मंगल कार्यालय व जिवती तालुक्यातील टेकाअर्जुनी शिवमंदिराजवळ भाजपा बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व पदाधिकारी यांचा अभ्यास वर्ग संपन्न झाला. या वर्गाला केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, राजुरा विधानसभेचे आमदार अॅड. संजय धोटे, भाजपा पुर्व विदर्भ प्रभारी (अभ्यास वर्ग) श्रीकांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वर्गाला लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे, जिल्हा महामंत्री राहुल सराफ, विधानसभा विस्तारक सतीश दांडगे, आदीवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघुजी गेडाम यांनी पक्षाचा अजेंड्याबद्दल उपस्थितींना संबोधित केले.
राज्य व केंद्र सरकार शतक-यांच्या हिताचे अनेक निर्णय या सरकारने घेतले असुन गृहीनीना चुलीपासुन मुक्त करण्यासाठी उज्वला योजना, प्रत्येक घरात विज कनेक्षन पोहचावे यासाठी सौभाग्य योजना, गरजुंना स्वस्त दरात औषध उपलब्ध व्हावेत यासाठी अमृत योजना यांसारख्या अनेक योजना यषस्वी सुरू आहेत. या योजना समाजाच्या शेवट पर्यंत पोहचाव्या यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचेही ना. अहीर यांनी सांगितले.
अभ्यास वर्गाला जिवतीचे तालुका अध्यक्ष केव गिरमाजी, कोरपनाचे तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, जि.प. सभापती सौ. गोदावरी केंद्रे, जिवती पं.स.चे सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, जि.प.सदस्या कमला राठोड, जिवतीच्या नगराध्यक्ष पुश्पा नैताम सोयाम, गटनेते अमर राठोड, कोरपना प.स. सदस्य नुतन जिवणे, नगरसेवक सतिश उपलेंचवार, सुरेष केंद्रे, रमेष मालेकर, सचिन डोहे, राजेश राठोड, संजय मुसळे, कवडु जरिले, अरून मडावी, जया धारणकर, सविता पेटकर, हितेश चव्हाण, विषाल गज्जलवार, गोपिनाथ चव्हान आदींसह बुथ व शक्तीकेंद्र प्रमुखांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.