धनगर आरक्षणविषयक 'एल्गार महामेळावासाठी सभा


धुळे/ गणेश न्याहलदे, खबरबात
जैताणे गावात मनमाड येथे होत असलेल्या ,एल्गार महामेळाव्याच्या'निजोजन करण्यासाठी व माहिती संदर्भात धनगर समाज आरक्षण कृती समिती जिल्हा नाशिक चे पदाधिकारी मा श्री मच्छिन्द्र जी बिडगर, श्री राजाभाऊ खेमनार,श्री भगवान शेरमाने, तसेच श्री झुलाल आण्णा पाटील यांनी जैताणे येथील समाज बांधवांनी बैठक घेतली या बैठकीचे आयोजन जैताणे ग्रामपालिकेचे माजी उपसरपंच व जैताणे गावातील धनगर समाजाचे नेते श्री अशोक मुजगे यांनी केले
दि 30/11/2018 रोजी उत्तर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या सर्व लोकांसाठी धनगर समाज आरक्षण कृती समिती जिल्हा नाशिक च्या वतीने मनमाड ता नांदगाव जि नाशिक येथे धनगर समाजाचे नेते मा श्री गोपीचंद जी पडळकर व श्री उत्तमराव जी जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एल्गार महामेळाव होणार आहे त्या संदर्भात निजोजन करण्यासाठी या महामेळाव्याची माहिती देण्यासाठी विठ्ठल मंदिर जैताणे या ठिकाणी मोठी बैठक पार पडली। श्री अशोक मुजगे यांनी प्रास्ताविक करताना जैताणे गावातील समाज बांधवांनी आत्ता पर्यंत आरक्षण अंमलबजावणी साठी केलेल्या विविध आंदोलनाची माहिती प्रमुख उपस्थिताना दिली
व श्री मच्छिन्द्र बिडगर यांनी सांगितले की धुळे ,जळगाव ,नंदुरबार ,नाशिक,या चारही जिल्ह्यातील सर्वात मोठा धनगर समाज या जैताणे गावात राहतो म्हणून या मेळाव्यात या गावाची उपस्थित सर्वात जास्त प्रमाणात असली पाहिजे, या मेळाव्या प्रसंगी श्री बापू भलकारे,बाजीराव पगारे,पंकज पगारे,सागर बोरसे,किरण पगारे,जितेंद्र पेंढारे ,गणेश न्याहळदे,व सर्व धनगर समाज बांधव उपस्थित होते