शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 7 डिसेंबरला विराट मोर्चा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
दिनांक 7 डिसेबंर 2018 शुक्रवारला होणार्या शेतकर्यांचा विराट मोर्चा कोठारी पासुन  म.रा.वि.मं.कार्यालय बापूपेठ ,चंद्रपूर सकाळी 10 वाजतापासुन पैदल मार्च निघणार आहे.

     या मोर्चाच्या प्रमुख मांगण्या शेतीसाठी चोविस तास विद्युत मिळालीच पाहीजे .लोडशेडींग व अवाढव्य विद्युत दर कमी झालेच पाहीजे .क्रुषीपंपाना मोफत विद्युत मिळालीच पाहीजे.' चंद्रपूर जिल्हा लोडशेडींग मुक्त करण्यात यावा. 'बल्लारपूर तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा. 'शेतीयंत्र व शेतीसाधणांवरिल G. S. T.  कर त्वरीत रद्द करावा
    तसेच शेतकर्यांच्या विविध मुलभुत मांगण्याना घेऊन शेतकरी बांधवाचा विराट पैदल मार्च बिआरएसपी विदर्भ प्रदेश महासचिव राजुभाऊ झोडे यांच्या नेत्रुत्वात दि.7 डिसेबंर 2018 ला सकाळी 10 .00 वाजता कोठारीपासुन चंद्रपूर पर्यंत निघणार आहे .तरि सदर मोर्चास मोठ्या संख्येनी सामील होण्याचे आवाहन राजुभाऊ झोडेे यांनी शेतकरी बांधवाना केले आहे.