'त्या' मुनगंटीवारच्या वायरल व्हिडिओचे पडसाद ग्रामीण भागातही पसरले !




'त्या' मुनगंटीवारांच्या वायरल व्हिडिओचे पडसाद ग्रामीण भागातही पसरले !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील खिर्डी गावातील मारुती आंबटकर या तरुणांने संतापाच्या भरात मुनगंटीवार यांच्या प्रचार रथावर सेंन फेक केली. काय होते नेमके कारण?
चंद्रपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विजय संकल्प सभा घेण्यात आली. त्या सभेत चंद्रपूर लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून ग्रामीण भागातही पडसाद उमटले आहे. या वादग्रस्त वक्त त्यावरून संतप्त झालेल्या तरुणाने मुनगंटीवार यांच्या प्रचार रथावर शेण फेक केली. या घटनेचा व्हिडिओ संपूर्ण वायरल झाला.
मुनगंटीवार यांनी भाऊ बहिणीवर केलेलं वादग्रस्त वक्तव्य केलेला व्हिडिओ देखील लाव अन्यथा ते बंद कर असं तो म्हणाला. रथ प्रचाराच्या ड्रायव्हर सोबत त्यांनी हुज्जत घातली.
एलईडी बंद केल्यानंतर अचानक संतप्त झालेल्या तरुणानं मुनगंटीवार यांच्या प्रतिमेवर शेणफेक सुरू केली. त्याला काही लोकांनी परिवारांनी समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानं संतापाच्या भरात तो थांबला नाही. याप्रकरणी तरुणाला ताब्यात घेण्यात आली असल्याची सूत्राची माहिती आहे.
1984 साली च्या आणीबाणी दरम्यान काँग्रेसनं विरोधकांची माहिती काढण्यासाठी भावा-बहिणीला एका खाटेवर झोपवून अत्याचार केला, असं वादग्रस्त वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM )यांच्या प्रचारसभेत केलं होतं. यावरून त्यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठत आहे.
याबाबत काँग्रेसवाल्यांनी सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली .
चंद्रपूर -वनी -आणीँ लोकसभा क्षेत्राच्या काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर तर भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार हे उमेदवार आहेत. सध्या भाजपा विरुद्ध काँग्रेस असा प्रचार सुरू आहे. 8 एप्रिलला मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावरून लाखो लोकांच्या समोर बोलताना मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्षाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भाजपाची सत्ता आली तर या देशात हुकूमशाही येईल , सविधान संपवण्यात येईल असा प्रचार काँग्रेसकडून करण्यात येत आहे, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला होता. याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला नाही. ज्यांनी आणीबाणी लावली, शीख दंगलीत काँग्रेसने विरोधकांची माहिती काढण्यासाठी भावा-बहिणीला एका खाटेवर झोपवून अत्याचार केले, असं वादग्रस्त वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. यानंतर मुनगंटीवार यांच्यावर टीका होत आहे. मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यावर मुनगंटीवारांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, या व्हिडिओचा विपर्यास केल्या जात आहे. अर्धवट व्हिडिओ दाखवून वायरल केल्या जात आहे. त्या संदर्भाची तक्रार सायबर सेल कडे करणार असल्याचेही त्यांनी माध्यमाकडे बोलले.