सेलूच्या अय्युब दाम्पत्यांस भारतीय दलित साहीत्य अकादमीचे राष्ट्रिय फेलोशिप पुरस्कार जाहीर

परभणी/प्रतिनिधी:

दिल्ली येथील भारतीय दलित साहीत्य अकादमी २०१८ च्या राष्ट्रिय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असुन, महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रिय फेलोशिप पुरस्कार २०१८ साठी सेलू नगर परिषदचे कक्ष अधिकारी शेख म. अय्युब अमिनोद्दिन यांची व वीरांगना सावित्रीबाई फुले राष्ट्रिय फेलोशिप पुरस्कारासाठी सेलू येथील प्रभाग क्र. ४. अ ची नगरसेविका शेख अख्तर बेगम शेख म. अय्युब या पतिपत्नीच्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन घोषित करण्यात आला आहे.
दिल्ली येथे भारताचे माजी उपपंतप्रधानमंत्री कै. बाबू जगजिवनराम यांनी स्थापन केलेल्या भारतीय दलित साहीत्य अकादमीच्या २०१८ च्या राष्ट्रिय पुरस्काराची घोषणा दिल्ली येथे अकादमीचे अध्यक्ष प्रा. डॉ. एस.पी. सुमनाक्षर यांनी नुकतीच केली असुन त्या आशयाचे पत्र श्री शेख म. अय्युब व नगरसेविका शेख अख्तर बेगम यांना प्राप्त झाले आहे.
सदरील पुरस्काराचे वितरण देशी, विदेशी मान्यवरांच्या उपस्थितीत दि. ९ डिसेंबर २०१८ रोजी नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात करण्यात येणार आहे.
क्रांती सुर्य महात्मा ज्योतीबा फुले व विरंगना सावित्रीबाई फुले या पुरोगामी गोडजोडीच्या नावांच्या पुरस्काराची घोषणा सेलू येथील शेख म. अय्युब व त्यांच्या पत्नी नगरसेविका शेख अख्तर बेगम या दाम्पत्यांस झाले हे योगायोगचं आहे. पती- पत्नीस जाहीर झालेल्या प्रतिष्ठित पुरस्काराबद्दल या उभयतांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.