चंमनपात महापौरांसाठी उच्चशिक्षित अँड. सारिका संदुरकरांना संधी मिळेल ?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत नवनिर्वाचित नगरसेविका ऍडव्होकेट सारिका सचिन संदुरकर प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्प या प्रभागातून क गटातून साधारण महिला मधून निवडून आल्या. त्या उच्चशिक्षित असून सर्वसामान्य जनतेत त्यांनी आपला समाजसेवेचा व्रत जोपासलेला आहे. त्यामुळे त्यांना या बंगाली कॅम्प प्रभागातून 2583 मत प्राप्त करीत विजयश्री प्राप्त केला.
त्या शांत स्वभाव मनमिळाऊ आणि जनतेमध्ये निस्वार्थपणे सेवाभावी कार्य करत असतात. त्यांना अधिवक्ता म्हणून सोळा वर्षाचा दांडगा अनुभव, शासकीय सेवेत केलेले अनुभव, सामाजिक कार्य, त्याचबरोबर जनतेत आरोग्य सेवा, विविध भाषाशैली त्यांना अवगत असून राजकीय सामाजिक क्षेत्रात त्या कार्यरत आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या विविध पदावर त्यांनी आपला कार्यभार सांभाळला आहे. त्या ओबीसी महिला प्रवर्गातून लढल्या नसल्या तरी, महानगरपालिकेत महापौरांसाठी ओबीसी महिला प्रवर्गात आरक्षण आल्याने त्या ओबीसी प्रवर्गात येत असल्याने त्यांना महापौरसपदी संधी देण्यात यावी अशी मागणी जनतेकडूनच होत आहे.
त्या २०२६ च्या निवडणुकीत चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदाचे ओबीसी महिला आरक्षण घोषित झाल्यामुळे भाजपाने महापौर बनविण्याकरीता एक संधी प्राप्त व्हावी अशी पक्षश्रेष्ठीकडे चंद्रपूरकरांनी इच्छा दर्शवली आहे. या उच्चशिक्षित असल्यामुळे चंद्रपूरकरांना उच्चशिक्षित असा महापौर लाभावा अशी चंद्रपूरकरांची ही सदिच्छा आहे.
