प्रधानमंत्री उज्वल गॅस योजना वितरण समारंभ


उर्जानगर :अमोल जगताप

पंचायत समिती चंद्रपूर अंतर्गत ग्राम पंचायत उर्जानगर क्षेत्रात प्रधानमंत्री उज्वल गॅस योजने अंतर्गत भारतीय जनता पार्टी शाखा उर्जानगरचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरी जाऊन अर्ज भरून घेतले व एकूण ३४ महिलांना प्रधानमंत्री उज्वल ग्यास योजनेचा लाभ मिळवून दिला.

या लाभार्थ्यांना माननिय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान यांचे जयंतीचे औचित्य साधून दिनांक २५/१२/२०१८ ला घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवरांचे शुभ हस्ते गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले.यावेळी माजी जि. प. सदस्य शांताराम चौखे म्हणाले कि, आम्ही जास्तीत जास्त लाभार्थ्या पर्यंत पोहचून राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या योजना गोरगरीब जनते पर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले. तसेच माजी जि. प.सदस्य विलासबाबू टेम्बुरने यांनी उपस्थितांना या योजनेची माहिती दिली. याप्रसंगी जि. प.सदस्य सौ.वनिता आसुटकर, प.स.सदस्य सौ.केम रायपुरे,ग्रा. प.सदस्य सौ . लिना चिमुरकर,ग्रा. प. सदस्य सौ.चोपकर, सौ . माला रामटेके, सौ. दिपा धारकर, सौ.गीता नन्नावरे, सौ.गंधेवार, नामदेव आसुटकर, मनोज मानकर,दिनेश धारकर गॅस एजन्सीचे मॅनेजर विजय सर उपस्थित होते.