बिआरएसपी चे राष्ट्रीय महामार्ग मुल वर रास्तारोको आंदोलन

मुल/रमेश माहूरपवार:
   बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी द्वारा मुल चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरिल रखडलेल्या रस्त्याच्या बांधकामासाठी बीआरएसपी चे विदर्भ प्रदेश महासचिव राजु झोडे यांच्या नेत्रुत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

   मागिल दोन वर्षापासुन राष्ट्रीय महामार्ग मुल वरिल मुख्य रस्ता नियमांना डावलुन खोदण्यात आला. या महामार्गामुळे मुल चंद्रपूर या मार्गावरिल प्रवाश्यांचे मोठे हाल होत आहे. अर्धवट कामामुळे या  रस्त्यावर कित्येक मोठे अपघात होऊन काही जणांचे जीव पण गेले . रस्त्यावरिल धुळीमुळे मोठे प्रदुषण होत असुन य़ाकडे सबंधीत प्रशासनाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष होतांना दिसत आहे. बिआरएसपीचे राजू झोडे यांच्या वतीने अनेकदा निवेदन देऊनही संबधीत प्रशासनाने  दखल घेतली नाही. सबंधित अधिकारी व कंत्राटदाराच्या संगनमताने सदर कामं करण्यात येत असल्याचा आरोप झोडे यांनी केला. सदर मार्ग वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या भागातून जात असल्याने आणि शासनाची परवानगी नसतांना हा मार्ग खोदुन ठेवला त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होते आहे. या समस्येवर  बिआरएसपी ने कठोर भुमीका घेऊन या महामार्गावरिल संपूर्ण रास्ता रोखुन तिव्र निषेध दर्शविला. सबंधीत अधिकारी व कंत्राटदारावर यांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाश्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.  करिता सबंधीत अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची जोरदार  मागणी राजु झोडे यांनी केली. मूलचे तहसिलदार राजेश सरवदे,राष्ट्रीय महामार्ग विभागाचे  उपविभागीय अभियंता  अशोक मत्ते यांनी  या महामार्गाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले .
     जर येत्या पंधरा दिवसात या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर संबधीत कार्यालयाला ताळे ठोकुन तिव्र निषेध करणार असा ईशारा पझोडे यांनी  दिला . या  रास्तारोको आंदोलनात बिआरएसपीचे विदर्भ प्रदेश मनिष पूणेकर तालुकाअध्यक्ष शैलेश वनकर, सुजित खोब्रागडे,गौरव शामकूळे,काजु खोब्रागडे,नागेश दुधबळे ,बालाजी सातपूते,अमोल नामेवार,अक्षय नामोलवार,वि्श्वास कोल्हे,ईरफान पठान,छोटु आकबत्तलवार,अनिकेत वाकडे,नागेश दुधबडे,बालाजी सातपूते,अजय मेश्राम ,बंडुभाऊ निमगडे ,सुरज देवगडे ,रितीक चोखांन्द्रे ,रोहीत शेंडे ,सोहन दहीलकर,आकाश दहीवले,आकाश येसनकर ,अजय दहीवले,आंनद येसनकर,वतन चिकाटे तथा असंख्य बिआरएसपी कार्यकर्त्यांनी  रास्तारोको आंदोलन करुन कंत्राटदार आणि पालकमंत्र्याचा निषेध केला.