दत्त जयंती व हनुमान जयंती निमित्त गोपालकाल्याचे आयोजन

चिमूर/रोहित रामटेके:

चिमूर तालुक्यातील कोटगाव येथे दोन दिवसीय दत्त जयंती व हनुमान जयंती निमित्त गोपालकाल्याचे आयोजन श्री गुरुदेव भजन मंडळ कोटगाव व नामदेव महाराज महिला भजन मंडळ कोटगाव यांच्या तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला गावातील लोकांचे सहकार्य व नवयुवक तरुणाचे सहकार्य मोलाचे लागले.
दत्त जयंती व हनुमान जयंतीच्या कार्यक्रम दोन दिवसीय कार्यक्रमाची सांगता २७ डिसेंबर ला झाली. यामध्ये २६ डिसेंबर ला घटस्थापना ह.भ.प. श्रीराम कापसे महाराज व ह.भ.प. खेमराज कापसे महाराज याच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावा खेड्यातून महिलांचे तसेच पुरुषाचे भजन मंडळांना आमंत्रित करून २६ डिसेंबर ला रात्रभर जागृती करण्यात आली. २७ डिसेंबर ला सकाळी गावातून रामधून काढून व नंतर हनुमान देवस्थान कोटगाव (हेटी) या देवस्थानामध्ये गेली. ह. भ.प.शरद महाराज वैद्य कीर्तनकार याचे कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तन करून गोपालकल्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित चंद्रपुर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कांग्रेस गटनेता मा.सतीशभाऊ वारजूकर तसेच प्रमुख पाहुणे चिमूर पंचायत समितीच्या सदस्या सौ भावनाताई बावणकर, चिमूर नगर परिषदचे नगरसेवक विनोद ढाकुणकर,चिमूर पंचायत समितीचे माजी सदस्य राजुभाऊ कापसे आदी उपस्थित होते.